• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात मुलींची बाजी

CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात मुलींची बाजी

CBSE Board 12th Result 2021 Declared: CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 30 जुलै: CBSE बोर्डाचा 12 वीचा (CBSE 12th Result 2021) निकाल जाहीर झाला आहे. 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी 14 लाख 30 हजार 188 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी रेग्युलर विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 4 हजार 561 असून त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 96 हजार 318 आहे. (CBSE Board 12th Result 2021 Declared) दिल्लीतील 2 लाख 91 हजार 606 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 91 हजार 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण झालेली टक्केवारी 99.13 टक्के इतकी आहे. दिल्ली विभागात यावर्षी 99.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE 12वीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर तसंच काही अन्य डिजीटल प्लॅटफॉर्मवर जसं की डिजीलॉकवर वेबासाईट digilocker.gov.in आणि अन्य अॅपवर निकाल बघू शकणार आहेत. CBSE 12th Result 2021 असा चेक करा: cbseresults.nic.in या वेबसाईटवर जा. CBSE 12/10 निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर आणि अन्य आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा. तुमच्यासमोर तुमचा निकाल दिसेल. सीबीएसई 12 वी निकाल डाऊनलोड करण्यासाठी सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाऊनलोड करुन ठेवा. Maharashtra HSC Result 2021: 12 वीच्या निकालासंदर्भातली मोठी अपडेट येथे बघू शकता निकाल results.gov.in cbseresults.nic.in Digilocker.gov.in DigiLocker App UMANG App cbse.gov.in
    Published by:Pooja Vichare
    First published: