मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अजब! मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या तिजोरीत भरघोस भर

अजब! मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या तिजोरीत भरघोस भर

कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. बाहेर फिरताना नागरिकांनी मास्क घालणं अनिवार्य आहे.

मुंबई, 24 मे: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. बाहेर फिरताना नागरिकांनी मास्क घालणं अनिवार्य आहे. मात्र अनेक नागरिक या नियमांची पायमल्ली करताना दिसून येतात. अशा नागरिकांवर मुंबई महापालिके (The Municipal Corporation of Greater Mumbai) कडून कारवाईही करण्यात येते. याच कारवाई (Recovered 55 Crore) मुळे पालिकेला भरघोस उत्पन्न मिळाल्याचं समजतंय.

अनेक बाबतीत मुंबई पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. पण मास्क न घालणाऱ्यांमुळे पालिकेच्या खजिन्यात भर पडली आहे. पालिकेनं मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल 55 कोटी रुपये वसूल केले आहेत.

पालिकेनं आतापर्यंत तब्बल 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये वसूल केलेत. एप्रिल 2020 ते 23 मे 2021 पर्यंत 418 दिवसांच्या कालावधीत ही दंडाची वसूली पालिकेतर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा- लसीकरणासाठी BMCचं नियोजन, 'हे' तीन दिवस नोंदणी न करता मिळेल लस

27 लाख 58 हजार 649 मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सगळ्यात जास्त अंधेरी पश्चिम वॉर्डात 1 लाख 87 हजार 810 जणांवर कारवाई करत 3 कोटी 79 लाख 95 हजार 600 रुपयांची दंडात्मक वसूली करण्यात आली आहे. अंधेरीनंतर कुर्ला प्रभागात  1 लाख 38 हजार 718 लोकांवर कारवाई करत 2 कोटी 79 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. पालिकेचे क्लीन अप मार्शल, मुंबई पोलीस आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या एकत्रित कारवाईतून ही दंड वसूली करण्यात आली आहे.

First published:

Tags: BMC, Coronavirus, Mask, Mumbai muncipal corporation