मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लसीकरणासाठी BMCचं नियोजन, 'हे' तीन दिवस नोंदणी न करता मिळेल लस

लसीकरणासाठी BMCचं नियोजन, 'हे' तीन दिवस नोंदणी न करता मिळेल लस

मुंबई महापालिका (BMC) शहरातील लसीकरण सुरळीत करण्यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत असते. त्यानुसार पालिकेनं आता नागरिकांसाठी नवी सुविधा आखली आहे.

मुंबई, 24 मे: मुंबई महापालिका (BMC) शहरातील लसीकरण सुरळीत करण्यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत असते. त्यानुसार पालिकेनं मुंबईतल्या नागरिकांसाठी नवी सुविधा आखली आहे. या आठवड्याचं पालिकेनं लसीकरणा (Corona Vaccination)च नियोजन आखलं आहे. तसंच या नियोजनाचं वेळापत्रक ही पालिकेनं जाहीर केलं आहे. मुंबई पालिके (The Municipal Corporation of Greater Mumbai) नं आता तीन दिवस वॉक इन लसीकरणं (corona vaccine registration)ठेवलं आहे.

या आठवड्यात तीन दिवस हे वॉक इन (Walk In) लसीकरण असेल. म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस नागरिक वॉक इन जाऊन लस घेऊ शकणार आहे. त्यासाठी नागरिकांना नोंदणी करण्याची गरज नाही.

यात 60 वर्षांवरील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस, आणि 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस या सुविधमुळे मिळेल. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवशी या वयोगटातील केवळ नोंदण केलेल्यांना लस मिळणार आहे.

हेही वाचा- आयुष्य संपवत होती आमदाराची पत्नी, पोलिसांनी उचललं 'हे' पाऊल

मुंबई महापालिकेने एकीकडे वॉक इन लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर दुसरीकडे प्रत्येक केंद्रावर केवळ 100 डोस उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण सुरू होताच लस संपली असा प्रकार घडत आहे.

कसं असेल वॉक इन लसीकरण

24 ते 26 मे 2021 दरम्यान 3 दिवस कोरोना लसीकरणासाठी स्लॉट बुकिंगची गरज असणार नाही आहे. लसीकरण केंद्रावर जे येतील त्यांना थेट जागेवरच लसीकरण (वॉक इन) होईल. यानंतर 27 ते 29 मे 2021 या 3 दिवशी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस घेता येईल. तसेच रविवारी (30 मे ) रोजी लसीकरण बंद असेल. या सुविधेबाबत मुंबई महानगरपालिकेकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Mumbai, Mumbai muncipal corporation