मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /"तुम्ही कितीही करा हल्ला पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला" महापौर किशोरी पेडणेकर यांचे अमित साटमांना प्रत्युत्तर

"तुम्ही कितीही करा हल्ला पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला" महापौर किशोरी पेडणेकर यांचे अमित साटमांना प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 15 जानेवारी : मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉचट्सअप चॅट बॉट (BMC WhatsApp Chatbot) सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका करणाऱ्या भाजपला सणसणीत टोला लगावला. त्यानंतर आज भाजपचे आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. अक्कल कशासाठी लागते हे भाजप इतकं कुणाला माहिती नाही. सचिन वाझे हा लादेन नाहीये हे सांगायला अक्कल लागत नसते, स्थायी समितीच्या बैठकीत 5 टक्के घ्यायलाही अक्कल लागत नाही असं म्हणत अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. अमित साटम यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनीही अमित साटम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, प्रत्येकाने आपला अजेंडा घेतलाय तो विरोधाचा घेतला आहे. यशवंत जाधव, इक्बाल चहल आपलं काम करत आहेत. चहल यांनी कोरोना काळामध्ये चांगलं काम केलं आणि हीच विरोधकांची पोटदुखी आहे. फ्रस्ट्रेशनमधून ही मुक्तफळे बाहेर येत आहेत.

मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला

जेव्हा इतकी वर्ष तुम्ही बरोबर होतात तेव्हा काय केलं? तुमच्या बुद्धीला तेव्हा गंज होता का तुमच्याकडे पद होतं तरी तुम्ही काय केलं? मांडीला मांडी लावून नव्हे मांडीतच बसून होतात ना? अविश्वास ठराव सर्वानुमते संमत व्हावा लागतो. तुमच्यासारखx मीडियासमोर झळकायचं काम नाही. भाजपचं राजकारण खालच्या पातळीला जातंय. तुम्ही कितीही करा हल्ला, शिवसेनेचा मजबूत आहे किल्ला असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Coronavirus in Maharashtra: "... तर कठोर निर्णय घेणार" उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

काय म्हणाले होते अमित साटम?

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अमित साटम यांनी म्हटलं, मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. यशवंत जाधव सारख्या सहकाऱ्यांवर त्यांना अभिमान असेलच. आयकर विभागाच्या तपासात 15 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा पुरावा, त्यात जबाब नोंदवला गेला आहे. प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावावर करुन अनसिक्युअर्ड लोन दाखवून कशा प्रकारे 15 कोटींची गोलमाल केली आहे. स्थायी समितीच्या टक्केवारीतून मिळवलेला पैसा कशाप्रकारे त्या ठिकाणी फिरवला आहे. अशा सहकाऱ्यांवर अभिमान तर असेलच.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (14 जानेवारी) बीएमसीच्या WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. काम न करताना बोलणारे अनेक जण आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. आपलं लोक कौतुक करत नसले तरी कोविडच्या संकटात केलेल्या कामाचं न्यूयॉर्कपासून न्यायालयापर्यंत अनेकांनी केलं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कौतुक कुणी करावं म्हणून आपण ही कामं करत नसलो तरी देखील एक कर्तव्य म्हणून आपल्याला ही कामे करावे लागतात. उद्या कौतुक किती होईल त्याची मला अपेक्षा नाहीये पण जरा कुठे काही कमी झालं तर महापालिकेच्या नावाने खापर फोडायला मात्र, सर्व मोकळे असतात. जरा काही झालं तर नगरसेवक काय करतायत? महापौर काय करतायत? आयुक्त काय करतायत? हे सर्व ठिक आहे.. पण तू काय करतोयस हे सांग. स्वत: काही करायचं नाही आणि महापालिका काय करते. प्रश्न विचारायला खूप सोपं असतं आणि प्रश्न विचारायाला फारकाही अकलेची गरज नसते असं मला वाटतं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

First published:

Tags: BJP, Kishori pedanekar, Mumbai, Shiv sena