Home /News /pune /

Coronavirus: "... तर कठोर निर्णय घेणार" उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Coronavirus: "... तर कठोर निर्णय घेणार" उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

महाराष्ट्रात आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात येणार का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारा यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 15 जानेवारी : संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांच्या (coronavirus in Maharshtra) संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या ही 40 हजारांच्या घरात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता आणखी कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्याची आवश्यकता आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू होणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राज्याच्या संदर्भातील निर्णय हे राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात. त्याची नियमावली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण घरच्या घरीच राहून उपचार घेत आहेत. त्या संदर्भात केंद्र आणि राज्याचं आरोग्य विभाग सातत्याने माहिती सुद्धा घेत आहेत. हे सर्व सुरू असताना जर उद्या ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि 700 मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनची मागणी राज्यात आली तर मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय कठोर निर्बंध घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या टीमचे सहकार्य या नात्याने काम करत आहोत. अधिकारीही काम करत आहेत. टास्क फोर्सही सातत्याने लक्ष देऊन आहे. मुख्यमंत्री तर दररोज कोरोनाच्या स्थिती संदर्भातला आढावा घेत आहेत. राज्यात निर्बंध; संपूर्ण नियमावली जशीच्या तशी कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. नागरीकांचे बाहेर फिरणे 1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी. 2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी. शासकीय कार्यालये 1. महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी. 2. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. 3. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था 4. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील. 5. कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी. 6. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. खासगी कार्यालये 1. कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील. 2. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे. 3. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. 4. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. लग्नसमारंभ - कमाल 50 व्यक्ती अंत्यविधी - कमाल 20 व्यक्ती सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम - कमाल 50 व्यक्ती शाळा आणि कॉलेज / कोचिंग क्लासेस (खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील) 1. विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम. 2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज. 3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम. 4. या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Coronavirus, Maharashtra, Pune

पुढील बातम्या