मुंबई, 21 सप्टेंबर: भिंवडी परिसरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली साधारण 100 लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यापैकी 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे तर 9 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहेत. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी तीन मजली इमारत कोसळली.
#UPDATE Death toll rises to 8 in Bhiwandi building collapse incident. Five more people have been rescued: Thane Municipal Corporation PRO #Maharashtrahttps://t.co/kGgAEs3vDP
भिवंडीमध्ये भल्या पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 25 कुटुंब असलेली तीन मजली इमारती कोसळली. मोठा आवाज झाला म्हणून आजूबाजूचे लोक काय झालं पाहायला आले. इमारत कोसळल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. ही तीन मजली इमारत 40 वर्षांपूर्वीची आहे. यामध्ये साधारण 25 कुटुंब आणि 100 च्या आसपास लोक राहात होते. NDRF आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. 24 ऑगस्टला महामध्ये 5 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं.