जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सरकारने मंजूर केलेला कायदा शेतकऱ्यांना कंपन्यांच्या दावणीला बांधणारा, राजू शेट्टी कडाडले

सरकारने मंजूर केलेला कायदा शेतकऱ्यांना कंपन्यांच्या दावणीला बांधणारा, राजू शेट्टी कडाडले

सरकारने मंजूर केलेला कायदा शेतकऱ्यांना कंपन्यांच्या दावणीला बांधणारा, राजू शेट्टी कडाडले

केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी या कायद्याला जोरदार विरोध केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या कायद्यावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘हा कायदा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे,’ असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. कार्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही,’ असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे. काँग्रेसकडूनही आक्रमक प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने मनमानी करत शेतकऱ्यांची जमीन आणि पाणी त्यांच्यापासून हिसकावून घेतलं आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांना सरकारने बड्या उद्योगपतींच्या हवाली केलं असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आणलेलं विधेयक हे घोडा होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं विधेयक हे गाढव आहे अशी टीका काँग्रेसचे खासदार आणि नेते अहमद पटेल यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात