मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील बीडीडीत राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, उद्या निघणार म्हाडाची लॉटरी!

मुंबईतील बीडीडीत राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, उद्या निघणार म्हाडाची लॉटरी!

'बीडीडी चाळीचे पुनर्विकास हा मुद्दा मागील अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास तरी या बिल्डिंगमधील रहिवासी यांना म्हाडाची चांगली घरे उपलब्ध होणार आहे'

'बीडीडी चाळीचे पुनर्विकास हा मुद्दा मागील अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास तरी या बिल्डिंगमधील रहिवासी यांना म्हाडाची चांगली घरे उपलब्ध होणार आहे'

'बीडीडी चाळीचे पुनर्विकास हा मुद्दा मागील अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास तरी या बिल्डिंगमधील रहिवासी यांना म्हाडाची चांगली घरे उपलब्ध होणार आहे'

मुंबई, 10 फेब्रुवारी :  इंग्रजांच्या काळात जेल म्हणून वापर करण्यात येत असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळ  (bdd chawl) कालांतराने घरांसाठी वापरली गेली. मुंबईतील (Mumbai) अत्यंत महत्वाच्या अशा वरळी (Worli), नायगाव (naigaon) भागामध्ये दिलेली चाळ यात मराठी माणूस राहत आहे.  बीडीडी चाळीतील रहिवासी यांच्यासाठी गुरुवारी मुंबईत म्हाडा लॉटरी (mhada lottery 2022) निघणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी दिली.

साधारणत: चारशे चौरस फुटांपेक्षा जास्त ही घरे असून 300 च्या आसपास या घरांची लॉटरी निघणार आहे. बीडीडी चाळीचे पुनर्विकास हा मुद्दा मागील अनेक वर्षे गाजत आहे. तुर्तास तरी या बिल्डिंगमधील रहिवासी यांना म्हाडाची चांगली घरे उपलब्ध होणार आहे, भविष्यात मुंबई शहर आणि उपनगर यासाठी देखील म्हाडाची लॉटरी निघेल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

सरपंचपदाच्या निवडणुकीआधी धक्कादायक घटना; ग्रामपंचायत सदस्याचं अपहरण

पालघर पोलीस दलातील 109 कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज इथं उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक 10 मधील सदनिका क्रमांकांची निश्चिती व वितरण आज  जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे 119 एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा - 3 मधील इमारत क्रमांक 10 मधील 186 सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या दिनांक 04 जानेवारी 2019 रोजीच्या ठराव क्रमांक 6809 अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

सदर 186 सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरीता मार्च 2019मध्ये जाहिरात देण्यात आली. त्यानुसार, पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून 109 अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली. या 109 कर्मचाऱ्यांना इमारतीतील कितव्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वितरित करावयाची, याची निश्चिती व त्यांचे वितरण आज करण्यात आले.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून फडणवीसांचा अजितदादांना सणसणीत टोला

पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यास उर्वरित 77 सदनिकांचेही वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 434.97  ते 453.27  चौरस फूट असून या सदनिकांची अंदाजित विक्री किंमत रुपये 27 लाख रुपये आहे. या योजनेतील टप्पा - 3 मधील इमारतींना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

दरम्यान, मी प्रवक्ता म्हणून बोलत नाही तर बीडीडी चाळीतील रहिवाशी म्हणून बोलत आहे. अजून इमारत नाही आणि चावी कसली देत आहे.  हवेतील घराच्या कागदाच्या चाव्या म्हाडा देत आहे. मंत्र्यांना म्हाडाचे अधिकारी चुकीची माहिती देऊन ही लॉटरी काढायला भाग पाडत आहे. कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी करत आहेत हे  कळत नाही. आम्ही साडेचार वर्ष आंदोलन केले, संघर्ष केला जर असं होत असेल तर आम्हाला पुन्हा संघर्ष करावा लागेल, अशा इशारा राजू वाघमारे यांनी दिला.

First published:

Tags: Maharashtra, Mhada 2022, Mhada lottery, Mumbai