• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • नवाब मलिकांचे NCB च्या कारवाईवर आरोप, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

नवाब मलिकांचे NCB च्या कारवाईवर आरोप, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 07 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan Drug Case) अटकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही आरोप केलेत. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी आणि भाजप नेते मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते. याचे फोटो व्हायरल झाले. भाजप नेत्याचा राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आधीच पत्रकार परिषद घेतली असून तरी सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे की, आम्ही पंचनामा करणाऱ्या नऊ जणांचं नाव दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व कारवाई करण्यात आल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलंय. इंडिया टुडेशी बोलताना समीर वानखेडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच ही कारवाई करण्यात आल्याचं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- आर्यन खानसोबत दिसलेल्या BJP नेत्याचं स्पष्टीकरण, सांगितलं... नवाब मलिक यांचे आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik ) यांनी पुराव्यानिशी NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. आर्यन खानची अटक ही बनावट आहे, मागील महिन्याभरापासून शाहरुख खान पुढील टार्गेट असणार अशी माहिती पसरवण्यात आली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. शनिवारी एनसीबी (NCB) नं CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. तसंच, आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती दिली जात होती की, पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. 'जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत टक्कल असलेला एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. हेही वाचा- मोठी बातमी: शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू त्यानंतर मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. पुढे मलिक म्हणाले की, अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे. या व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: