मुंबई, 07 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan Drug Case) अटकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, 2 ऑक्टोबर रोजी आर्यनसोबत दिसणारी व्यक्ती मोहन भानुशाली (Mohan Bhanushali) आहे, जो भाजप नेता आहे, असा आरोप केला. नवाव मलिक यांनी आरोप केल्यानंतर मोहन भानुशाली समोर आलेत. भानुशाली यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. भानुशाली म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचा पक्षाशी काहीही संबंध नाही, सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत.
Cruise ship party case| NCP leader Nawab Malik has put wrong allegations against me. BJP has nothing to do with it (the arrests). I received information on Oct 1 that a drugs party was to be held. I was with NCB officers(at the ship) for updated info: Manish Bhanushali,BJP worker pic.twitter.com/HGFKGdjSBX
— ANI (@ANI) October 6, 2021
मोहन भानुशालीनं वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटलं की, “राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. भाजपचा याच्याशी (अटक) काहीही संबंध नाही. 1 ऑक्टोबर रोजी मला माहिती मिळाली की ड्रग्ज पार्टी होणार आहे. अधिक माहिती गोळा करण्यासाठी मी NCB अधिकाऱ्यांसोबत क्रूझवर गेलो होतो. आर्यन क्रूझवर असेल अशी अपेक्षा नव्हती: NCB एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, शाहरुख खानचा मुलगा क्रूझवर असेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. कारण आम्हाला फक्त एका रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला की, जेव्हा आम्ही क्रूझवर पोहोचलो, तेव्हा आमच्या टीमला माहित नव्हते की आर्यन खान देखील तिथे आहे. आम्ही एका केबिन रूममध्ये शिरलो तेव्हा तो त्याच्या मित्रांसह उपस्थित होता तेव्हा आम्हाला कळले. आर्यनसोबत केबिन रूममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या एका मित्राकडून हशिश जप्त केलं आहे. त्यांचा प्लान ड्रग्स घेण्याचा होता. हेही वाचा- गणपती बाप्पा मोरया, आजपासून ‘श्री गणेशा’; ‘सिद्धिविनायका’च्या दर्शनाची नियमावली आर्यनविरुद्धचा खटला कमकुवत नाही आर्यन खानविरुद्धच्या ड्रग्सचा खटला प्रामुख्याने दोन पुराव्यांवर आधारित आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, ते पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे असतील. आर्यन खानची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबीला दिलेल्या जबाबाची सत्यता अद्याप न्यायालयात सिद्ध करणे बाकी आहे. आर्यन खानविरोधातील दुसरा पुरावा म्हणजे त्याचं व्हॉट्सअॅप चॅट असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. हेही वाचा- लखीमपूर खेरीचा horrible Video, मंत्र्याच्या SUV नं चिरडलं शेतकऱ्यांना आर्यन खाननं ड्रग्स घेण्याचा आधीच प्लॅन केला होता आणि त्याला पार्टीसाठीही आमंत्रित करण्यात आल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. आर्यनच्या मित्रांनी त्याला ड्रग्ज प्लॅनबद्दल सांगितलं. अधिकाऱ्यांनी दावा केला की, पहिला पुरावा आर्यन खाननं ड्रग्स घेतल्याच्या मुद्दाही मजबूत आहे. ते असेही म्हणाले की आर्यन खानच्या आधीच्या चॅट्समधून असेही दिसून आले आहे की त्यानं पूर्वीही ड्रग्सचे सेवन केलं होतं. दरम्यान एनसीबीला चॅटमधून मिळालेली माहिती सिद्ध करण्यासाठी पुरावे आणि जबाबांची आवश्यकता असेल.