मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोनाचं पुन्हा डोकंवर, दिवसभरात तब्बल 922 नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचं पुन्हा डोकंवर, दिवसभरात तब्बल 922 नवे रुग्ण

मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर : मुंबईत कोरोनाने (Mumbai Corona) पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patients) आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही कमी झालं होतं. पण मुंबईत आज दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दिवसभरात 326 रुग्णांनी कोरोनावर मात मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत आज दिवसभरात 326 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 922 नवे कोरोनाबाधित आढळल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या ही 4295 वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 1139 दिवस इतका आहे. तसेच 19 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंतचा कोरोना वाढीचा दर हा 0.06 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढली राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा कोरोनाने डोकंवर काढल्याने आज दिवसभरात तब्बल 1648 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात आज कोरोनामुळे तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 918 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हेही वाचा : धक्क्यावर धक्के, आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना मुंबईत आता ओमायक्रोनचाही उद्रेक जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूचा संसर्ग मुंबई वाढत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 31 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 27 रुग्ण हे मुंबईचेच असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाणे 2 आणि पुणे ग्रामीण आणि अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा यात समावेश आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची गेल्या काही दिवसांमधील रुग्णवाढ तारखेनुसार 26 डिसेंबर : 922 25 डिसेंबर : 757 24 डिसेंबर : 683 23 डिसेंबर : 602 22 डिसेंबर : 490 21 डिसेंबर : 327 20 डिसेंबर : 204 19 डिसेंबर : 336 18 डिसेंबर : 283 17 डिसेंबर : 295 16 डिसेंबर : 279 15 डिसेंबर : 238 14 डिसेंबर : 225 13 डिसेंबर : 174
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या