जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्क्यावर धक्के, आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना

धक्क्यावर धक्के, आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांचा आकडा वाढत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मेघे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली होती. विशेष म्हणजे समीर मेघे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात झाली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांसह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. सर्व गोष्टींची खबरदारी घेण्यात आली होती. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तीच घटना अखेर घडली आहे. अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अधिवेशनासाठी काम करणाऱ्या 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हेही वाचा :  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक लांबणार? राज्यपालांनी मागितला वेळ खरंतर हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांमध्ये होतं. पहिल्या आठवड्यात तीन दिवस आणि येणाऱ्या आठवड्यात दोन दिवस, असा कालावधी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेला होता. दोन्ही आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी बंधनकारक आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणारे सर्व आमदार, मंत्री, सरकारी कर्मचारी, पोलीस, पोलीस अधिकारी आणि पत्रकार या सर्वांची कोरोना चाचणी दोन्ही आठवड्यात केली गेली. दोन दिवसात या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये काही पोलीस, सरकारी कर्मचारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. पण एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.  आज रात्री उशिरापर्यंत आणखी अनेकजणांचे रिपोर्ट येणार आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे मुंबईत होतंय आणि मुंबईत गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाने मुंबईत पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे फक्त मुंबईत आज तब्बल 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काल हीच संख्या 757 इतकी होती. तसेच मुंबईत आज ओमायक्रोनचे तब्बल 27 नवे रुग्ण आढळले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात