Home /News /mumbai /

मुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत

मुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत

सध्या मुंबईसह राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत (Lack of oxygen) आहे. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशात मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरनं (Mulund jumbo Covid center) अनोख्या पद्धतीन ऑक्सिजन पुरवठ्याचं नियोजन (oxygen supply pattern) केलं आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बचत होतं आहे.

पुढे वाचा ...
मुलुंड, 14 मे: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) आल्यापासून राज्यात वेगानं रुग्ण संख्या (Corona cases) वाढत आहे. परिणामी मुंबईसह राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत (Lack of oxygen) आहे. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाची पुरती तारांबळ उडाली आहे. मात्र मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरनं (Mulund jumbo Covid center) अनोख्या पद्धतीन ऑक्सिजन पुरवठ्याचं नियोजन (oxygen supply pattern) केलं आहे. त्यामुळे या केंद्रावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाच नाही. उलट ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. ऑक्सिजन बचतीचा मुलुंडचा हा नवीन पॅटर्न सध्या खूपच हिट ठरत असून 50 टक्क्यांपर्यत ऑक्सिजनची बचत होतं आहे. कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पालिकेच्या वतीनं अनेक जम्बो कोविड रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली होती. मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर त्यापैकीच एक आहे. याठिकाणी सध्या 1650 खाटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये 700  ऑक्सिजन बेड आहेत. जेव्हा मुंबईतील बहुतांशी कोविड रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा या केंद्रावर मुबलक ऑक्सिजन साठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक रुग्णांना याठिकाणी उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आलं होतं. हे वाचा-कोरोना लस घ्यायला जाणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या! लसीकरण मोहिमेत BMC ने केला बदल येथील ऑक्सिजन पुरवठ्याच्या नवीन पद्धतीमुळे सर्व रुग्णांना मुबलक ऑक्सिजन मिळत असून मोठी बचतही होतं आहे. याठिकाणी अगोदर 10 लीटर प्रति मिनिट प्रति रुग्ण एवढा ऑक्सिजन पुरवठा लागत होता. पण आता केवळ 5 लीटर पर्यंत ऑक्सिजन लागत आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या दोन लिक्विड ऑक्सिजन टँकर बसवले असून 98 सिलेंडरमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. जी यावर नियंत्रण ठेवतं आहे. शिवाय दोन ऑक्सिजन बॉय देखील नेमण्यात आले आहेत. हे वाचा-भारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस! पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार या दोघांना योग्य प्रशिक्षण दिलं असून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कसा करावा? ऑक्सिजनची बचत कशी करावी? याबाबतचं तंत्र अवगत करून दिलं आहे. शिवाय डॉक्टरही याठिकाणी जातीनं लक्ष देत आहेत. ज्यामुळे या कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळून देखील मोठी बचत होतं आहे. मुलुंड कोविड सेंटरच्या या नव्या पॅटर्नचं राज्य सरकारने नेमलेल्या कमिटीनंही कौतुक केलं आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचा हाच पॅटर्न जर अन्य कोविड सेंटरमध्ये राबवला, तर राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सुटू शकतो.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Coronavirus, Covid centre, Mumbai, Oxygen supply

पुढील बातम्या