देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाते आहे. 1 मेपासून 18+ नागरिकांनाही कोरोना लस दिली जाते आहे.
2/ 7
त्यामुळे अनेक नागरिकांनी लस घेतली आहे, तर काही लस घेण्याच्या तयारीत आहे. तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारी असाल आणि मुंबईत राहत असाल तर मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
3/ 7
मुंबईत कोरोना लसीकरण मोहिमेत मोठा बदल करण्यात आला आहे. बीएमसीने काही नवे नियम बनवले आहेत.
4/ 7
सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवसच वॉक इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथं नोंदणी करून तुम्हाला लस घेता येईल.
5/ 7
वॉक इन लसीकरणाची सुविधा फक्त 60 पेक्षा जास्त वयाचे नागरिक, दिव्यांग नागरिक आणि कोरोना लशाची दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच असेल.
6/ 7
तर गुरुवार शुक्रवार, शनिवारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे केवळ कोविनवर नोंदणी आणि त्यानंतर लसीकरण केंद्र आणि लसीकरणाची वेळ निश्चित झाल्यावर होईल.
7/ 7
रविवारी मुंबईत लस दिली जाणार नाही. म्हणजे यादिवशी लसीकरण कार्यक्रम बंद असेल.