मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुकाराम मुंढेंच्या मताविरोधात ठाकरे सरकारचा निर्णय, दिला 'हा' आदेश

तुकाराम मुंढेंच्या मताविरोधात ठाकरे सरकारचा निर्णय, दिला 'हा' आदेश

मागील काही दिवसांपासून नागपूर महापालिका सर्वसाधारण सभा घेण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर यांच्यात वाद निर्माण झाला होता.

    नागपूर, 19 जून : नागपूर महानगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली असून, सभा कोविड-19 नियमांचे पालन करून घेण्यात यावी, असा आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आला आहे. तसंच याबाबत महाराष्ट्र शासनाने पत्रक काढण्यात आले आहे.

    मागील काही दिवसांपासून नागपूर महापालिका सर्वसाधारण सभा घेण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर यांच्यात वाद निर्माण झाला होता. कोविड-19 मुळे एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभा न घेण्यात यावी असा निवेदन केलं होतं, तर महापौर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सभा घेऊ असं स्पष्टपणे जाहीर केलं होतं.

    यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभेचा निर्णय राज्य शासनाच्या आधीन केला असून या सर्व बाबींवर राज्य शासनाने सभा घेण्यात यावी आणि ती covid 19 च्या नियमानुसार घेण्यात यावी, असं पत्रक काढून आदेश दिला आहे.

    एकीकडे महापौर यांनी जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास व्यक्त केला असून दुसरीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी (नो कंमेंट्स) अस बोलत विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

    संपादन - अक्षय शितोळे

    First published:
    top videos

      Tags: Nagpur news, Tukaram mundhe