Home /News /mumbai /

प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Murder in Mumbai: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने एका महिलेनं आपल्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या (mother killed minor son) केली आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर: अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडसर ठरत असल्याने एका महिलेनं आपल्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या (mother killed minor son) केली आहे. आरोपी महिलेनं प्रियकराच्या मदतीने 3 वर्षीय चिमुकल्याचा गळा घोटला आहे. यानंतर आरोपीनं मृत मुलाला शिराळा तालुक्यातील वाकुर्डे याठिकाणी घेऊन जात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. पण मृत मुलाच्या वडिलांना निनावी पत्र आल्यानंतर त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक (Accused mother and her boyfriend arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्राची सुशांत वाझे (30) असं अटक केलेल्या आरोपी आईचं नाव असून ती वाळवा येथील रहिवासी आहे. तर अमर विश्वास पाटील (36) असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. तो मूळचा शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील रहिवासी असून सध्या तो प्रेयसीसोबत मुंबईत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची हिचे गेल्या काही काळापासून अमर याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. याचा संशय मृत मुलाचे वडील सुशांत यांना देखील आला होता. हेही वाचा-बाप नजरेआड होताच साधला डाव; मुलीसोबत क्रूरतेचा कळस, भयावह स्थितीत आढळली तरुणी यानंतर आरोपी महिला आपला साडेतीन वर्षांचा मुलगा मनन सुशांत वाझे याला घेऊन, प्रियकर अमर पाटील याच्याकडे राहायला मुंबईत गेली होती. याठिकाणी राहत असताना चिमुकला मनन हा दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मननचा छळ करायला सुरुवात केली. यानंतर आरोपींनी मुंबईतच मननचा खून केला आणि त्याला शिराळा तालुक्यातील वाकुर्डे याठिकाणी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. हेही वाचा- Sangli: मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार एवढंच नव्हे तर मननचा मृत्यू मुंबईत झाला असतानाही संशयितांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र दाखल करून मननचा मृत्यू बिळाशी येथे झाल्याची खोटी माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणारं एक निनावी पत्र मृत मननचे वडील सुशांत वाझे यांना आलं. त्यानुसार सुशांत यांनी पत्नी प्राची आणि तिचा प्रियकर अमर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder

    पुढील बातम्या