Home /News /crime /

बाप नजरेआड होताच साधला डाव; मतिमंद मुलीसोबत क्रूरतेचा कळस, भयावह स्थितीत आढळली तरुणी

बाप नजरेआड होताच साधला डाव; मतिमंद मुलीसोबत क्रूरतेचा कळस, भयावह स्थितीत आढळली तरुणी

Crime in Osmanabad: उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका मतिमंद मुलीवर अज्ञात नराधमाने क्रूरतेच्या परिसीमा गाठल्या आहेत.

    उस्मानाबाद, 21 डिसेंबर: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील बेंबळी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका मतिमंद मुलीवर अज्ञात नराधमाने क्रूरतेच्या परिसीमा गाठल्या आहेत. आरोपीनं मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला बेदम मारहाण केली (Mentally retarded woman beaten up and raped) आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील शेतात गेल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. पीडित तरुणी मंतिमंद असून तिला अधून मधून वेडसरपणाचे झटके येतात. झटके आल्यास ती आसपासच्या लोकांना मारहाण करायला सुरुवात करते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आपल्या शेतात एक पत्र्याचं शेड उभारलं आहे. याठिकाणीचं त्या मुलीला ठेवण्यात आलं आहे. संबंधित मुलीसोबत नेहमी कुटुंबातील एक ना एक व्यक्ती असते. घटनेच्या दिवशी देखील पीडित मुलीचे वडील तिच्यासोबत होते. हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना पण घटनेच्या दिवशी वडील आजारी असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी गावात जायचं होतं. त्यामुळे वडिलांनी पीडितेला शेडमध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावलं आणि गावात निघून गेले. उपचार घेतल्यानंतर ते शेतात जाण्याऐवजी घरीच झोपी गेले. दरम्यान वडील नजरेआड होताच, अज्ञात आरोपीनं शेडचं कुलूप तोडून मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे. हेही वाचा-मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वडील शेतात गेले, तेव्हा शेडचं कुलूप तोडलेल्या अवस्थेत होतं. तर आतमध्ये तरुणी जखमी अवस्थेत पडली होती. हे भयावह दृश्य पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बेंबळी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Osmanabad, Rape

    पुढील बातम्या