कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 18 लाखांच्यावर, राज्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचा सर्व्हे करणार

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 18 लाखांच्यावर, राज्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचा सर्व्हे करणार

करोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई 23 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. मात्र संख्या नियंत्रणात असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तर दिवसभरात तब्बल 7 हजार 620 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 1 हजार 700 झाली आहे. तर Recovery Rate हा 94.51वर गेला आहे. दिवसभरात राज्यात 3 हजार 913 नव्या रुग्णांची भर पडली तर 93 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 19 लाख 6 हजार 371 झाली आहे.

करोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या  प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.

संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करतील.

मुंबईपाठोपाठ पुण्यातही घेतला मोठा निर्णय, विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती

या चाचणी मध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येतील.  या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल.

जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील 28 दिवस करण्यात येईल.

या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून 5 व्या ते 10व्या दिवसादरम्यान आर टी पी सी आर चाचणी करण्यात येईल.

धक्कादायक! तीन महिन्यांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू, नाशिक शहरातील घटना

जे कुणी 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरुन भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या/ महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 23, 2020, 8:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या