मुंबई, 17 मे : असनी चक्रीवादळामुळे (asani cyclone) राज्यातील काही भागात अद्यापही उष्णतेटी लाट वाहू लागली आहे. विदर्भातील (Heat wave in Vidarbha ) अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पारा 45 (heat wave Maharashtra) अंशाच्या पुढे आहे. तर राजस्थान, दिल्ली, पंजाब या भागात मोठी उष्णतेची लाट आहे. दरम्यान आज सोमवारी मान्सून अंदमानमध्ये आगमन झाले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. याचबरोबर काही भागात मान्सून (monsoon) पूर्व पावसाचा अंदाज हवामान (weather update) खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार (rain) पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
१६ मे, २०२२: पुढील 5 दिवस, IMD ने द. कोकण, द. मध्य महाराष्ट्र आणि द. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 16, 2022
प्लीज IMD अपडेट्स पहा. pic.twitter.com/gDGEM63nIc
हवामान विभागाच्या अंदाजानुसार तळकोकणात २ जूनपर्यंत मान्सूनचे (Monsoon) आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तसे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे. मच्छीमारांच्या माहितीनुसार समुद्रात फेसाच्या मोठ्या लाटा येत असल्याने पुढच्या दोन आठवड्यात मान्सून कोकणात सुरू होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेने नागरीक हैराण झाले आहेत. पुढच्या दोन दिवसांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये समुद्राला मोठी भरती येणार असल्याने मुसळधार पाऊस शक्यता आहे. याचा फटका मुंबई आणि उपनगरांना बसण्याची भिती हवामान खात्याने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे.