S M L

मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा

भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीनं पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2018 06:17 PM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा

मुंबई, 27 जून : मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज भुजबळ आणि इतर आरोपींना मनी लाँड्रिंग प्रकरणात तुर्तास दिलासा दिला आहे. ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी ईडीनं वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना ६ आॅगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. ६ आॅगस्टला कोर्ट आपला निकाल देणार आहे.

भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीनं पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून त्याचा विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीनं करण्यात आला.

आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामीनकरता बाँड देणं कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही असंही भुजबळांच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला. तसंच एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकीलांनी कोर्टाला करुन दिली.

'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?'

तर ईडीनं आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचं मान्य केलं पण त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडी कोर्टाला केली. यावर कोर्टाने ६ आॅगस्टला या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचं स्पष्ट करत तुर्तास भुजबळ कुटुंबियांसहित इतर आरोपींनाही दिलासा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 06:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close