'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?'

'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?'

एखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला ?, असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलंय.

बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का ?, याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

 जैनेंद्र बक्षी यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये तिथले महागडे अन्नपदार्थच विकत घ्यावे लागतात कारण तिथं घरगुती अन्नपदार्थांना आत नेण्यास मनाई असते. एखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे.

त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्याची परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं

तर आम्ही कुणावरही मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सक्ती करत नाही. हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. आरामदायी सोयीसुविधा पुरवणं हे आमचं काम आहे, त्या घेणं न घेणं याचा निर्णय लोकांनी घ्यावा, अशी भूमिका थिएटर मालकांच्यावतीने घेण्यात आली आहे.

तसंच उद्या ताज किंवा ओबेरॉयमध्ये जाऊन तुम्ही चहाचे दर कमी करा असं सांगणार का ?,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

First published: June 27, 2018, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading