मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

इनकमिंग ठरलं फायदेशीर, दुसऱ्या पक्षांतून आलेल्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी संधी..!

इनकमिंग ठरलं फायदेशीर, दुसऱ्या पक्षांतून आलेल्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी संधी..!

दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात चांगली संधी मिळाली असली तरी यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात चांगली संधी मिळाली असली तरी यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात चांगली संधी मिळाली असली तरी यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 7 जुलै: गेल्याच महिन्यात आसामच्या (Assam New CM) मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची वर्णी लागली. काही वर्षांपूर्वीच हेमंत शर्मा यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. काही वर्षात त्यांनी मुख्यमंत्रिपद गाठलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातील (Cabinet expansion) चर्चा होणारी नावे पाहिली तर असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे वर्षोनवर्षे भाजपमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील कपिल पाटील (2014), भारती पवार (2019) आणि नारायण राणे (2019) हे तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर 2021 च्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्यासोबत जवळीक असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये मोठा गदारोळ उभा राहिला होता. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढल्याच वर्षात त्यांचं तिकिट लागलं असून त्यांना थेट केंद्रिय मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे.

कपिल पाटील (Kapil Patil)

भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. सध्या नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यावरुन वाद सुरू आहे. अशावेळी शिवसेनेला आव्हान देण्यासाठी हे पद दिल्याची चर्चा आहे.

भारती पवार (Bharati Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्येे प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने मोठी चर्चा झाली होती. भारती पवार यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा-मोठी बातमी, मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंना डच्चू?

नारायण राणे (Narayan Rane )

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या दोन वर्षात त्यांनी राज्य सरकारवर टोकाची टीका केली आहे. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिही राहिले आहेत. त्यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya scindia)

मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघ हा शिंदे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 साली मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. पण त्यांच्याजागी काँग्रेसने अनुभवाला प्राधान्य देत कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवले. त्यानंतर शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शेवटी 10 मार्च 2020 रोजी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. नाराजीनंतर भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्यांचाही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) बुधवारी (Wednesday, 07 July) संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी (6.30PM) होणार असून जवळपास 20 मंत्री (20 ministers) शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याची यादी आणि इतर तपशील राष्ट्रपती भवनाला पाठवले जातील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 120 मान्यवरांना (120 invitee) आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे.

First published:

Tags: Jyotiraditya scindia, Maharashtra, Mumbai, Narayan rane, Narendra modi