काय आहे प्रकरण? राज्यात कोरोनाच्या उद्रेकानंतर नाट्यगृहं बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानही नाट्यगृहं बंद ठेवण्यात आली होती. नाट्यगृहं उघडण्यासाठी नाट्य कलावंतांनी अनेकदा आंदोलन केली. सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. या सर्व प्रयत्नांनंतर 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहं सुरू करण्याची घोषणा सरकारनं केली. मात्र तोपर्यंत नाट्यगृहं बंदच राहणार आहेत. शिवसेनेला वेगळा न्याय का? जर राज्यभऱातील नाट्यगृहं बंद आहेत आणि 22 तारखेपर्यंत कुणालाच नाट्यगृहात कुठलाही कार्यक्रम करायला परवानगी मिळणार नसेल, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला षण्मुखानंद हॉलमध्ये परवानगी कशी मिळाली, असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेनंच राज्यात आणि मुंबईत सरकार आहे, म्हणून त्यांना वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे. हे वाचा - "मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांचा चिमटा, म्हणाले.. मनसे करणार तक्रार दाखल इतरांना परवानगी नसताना, राज्य सरकारचेच नियम डावलून होणाऱ्या या दसरा मेळाव्याचा आपण निषेध करत असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. हा मेळावा घेणे चुकीचे असून तो जर पार पडला, तर आयोजकांविरोधात आपण रितसर तक्रार करू, असा इशारा मनसेनं दिला आहे.षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Shiv sena dasara melava, Shivseana