मुंबई, 23 ऑक्टोबर : मास्क वापरणार नाही, असा पवित्रा घेतलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाली असून वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. (Raj Thackeray corona test positive) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या आईंची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहेत. त्यानंतर आज राज ठाकरे यांचीही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लिलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत. ‘चमकोगिरी टाळायला हवी’, उज्ज्वल निकम यांचं नवाब मलिक Vs NCB वादावर परखड भाष्य कालच राज ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे पुण्याचा दोन दिवसीय दौरा रद्द केला होता. त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. 24 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.