• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव, राज ठाकरेंसह तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव, राज ठाकरेंसह तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री आणि मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत.

  • Share this:
    मुंबई, 23 ऑक्टोबर : मुंबईत कोरोनाचा (corona) हद्दपार झाला असं चित्र असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आला आहे. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Raj Thackeray corona test positive) आला आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या (Lilavati Hospital) डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणइ मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. आज राज ठाकरे यांचीही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लिलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत. 'चमकोगिरी टाळायला हवी', उज्ज्वल निकम यांचं नवाब मलिक Vs NCB वादावर परखड भाष्य कालच राज ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे पुण्याचा दोन दिवसीय दौरा रद्द केला होता.  त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.  राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. 24 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.
    Published by:sachin Salve
    First published: