मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'मनसे इम्पॅक्ट', सेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं, Video

'मनसे इम्पॅक्ट', सेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं, Video

शिवसेना भवनासमोर मनसेचं पोस्टर

शिवसेना भवनासमोर मनसेचं पोस्टर

गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली अनधिकृत मजार आणि सांगलीतल्या अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च : गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली अनधिकृत मजार आणि सांगलीतल्या अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईतल्या अनधिकृत मजारीवर कारवाई केली नाही, तर आम्ही एका महिन्यात तिकडे गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर लगेचच प्रशासन कामाला लागलं.

अवघ्या 24 तासाच्या आत माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजार अखेर हटवण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवलंय. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आलाय.. दुसरीकडे सांगलीतील अनधिकृत मशिदीवर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला.

सांगली आणि मुंबईतल्या या कारवाईनंतर मनसेकडून शिवसेना भवनबाहेर पोस्टर बाजी करत ठाकरे गटाला डिवचण्यात आलं आहे. 'मनसे इम्पॅक्ट, 12 तासांच्या आत माहीम, सांगली कारवाई पूर्ण,' असा बॅनर शिवसेना भवनबाहेर लावण्यात आला आहे.

गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरेंची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानात झाली. या सभेत राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओ कॅम्पेनचा पुन्हा प्रत्यय आला. या सभेत राज ठाकरे यांनी सांगली आणि माहीममधल्या अनधिकृत बांधकामाचे व्हिडिओ दाखवले होते.

First published:
top videos

    Tags: Raj Thackeray, Shivsena