मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'हे' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं? राज ठाकरेंचा हल्लाबोल

'हे' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं? राज ठाकरेंचा हल्लाबोल

'माझ्या आजोबांनी त्या काळात जे घडले त्यावर सर्व लिहिले होते. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं'

'माझ्या आजोबांनी त्या काळात जे घडले त्यावर सर्व लिहिले होते. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं'

Raj Thackeray on MVA Government: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई, 31 ऑगस्ट : दहीहंडी (Dahi Handi) साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आल्याने मनसे (MNS) आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच ठिकठिकाणी प्रतिमात्मक दहीहंडी साजरी केली. तर मनसेने गनिमीकावा करत मुंबई ठाण्यात दहीहंडी फोडल्या. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) जोरदार टीका केली आहे.

'हे' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं?

सर्व सण-उत्सव साजरे झालेच पाहिजे, तुम्हाला नियम लावायचे आहेत ना? मग सर्वांना नियम एक लावा. प्रत्येकासाठी नियम वेगळा असं करुन चालणार नाही. सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे. हे घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात तर त्यात आमचा काय दोष? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

तिसरी लाट येणार असं म्हटलं जात आहे यावर राज ठाकरेंनी म्हटलं, काय समुद्र आहे का? उगाच काहीतरी इमारती सील करुन टाकायच्या. यापूर्वी देशात कधी रोगराई आलीच नव्हती का? अमेरिकेचं अमेरिका पाहून घेईल. आत्ता सर्वांना बंद करुन ठेवायचं आणि यांची आखणी झाली की मग निवडणुका जाहीर करायच्या, की बाकिचे तोंडावर पडतील.

Dahi Handi: मनसेने दहीहंडी लावलीच; ठाण्यात विविध ठिकाणी हंडी फोडून मनसेकडून सरकारचा निषेध

हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं?

अस्वलाच्या अंगावर किती केस आहेत हे अस्वल कधी मोजत नाही तसंच मनसैनिकांवर किती केसेस आहेत हे आहे. हे सर्व सुडबुद्दीने सुरू आहे. शिवसेना जर विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

घंटानाद आंदोलन करणार

लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. इतर सर्व गोष्टी सुरू आहे परंतु दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जातंय. फक्त महाराष्ट्रात मुंबईत नियम का? जनआशीर्वाद चालते.... सणांच्या वेळी कोरोना पसरतो? मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

गेल्यावर्षीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे

सरकार सोयीनुसार निर्बंध लावत

नियम लावायचे असतील तर सर्वांना समान नियम लावा

शिवसेना विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं?

मंदिरे उघडली नाही तर मनसे घंटानाद आंदोलन करणार

दहीहंडी साजरी करण्यावरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

दहीहंडी साजरी करण्याचे मनसैनिकांना आदेश

हे घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं? राज ठाकरेंचा हल्लाबोल

लॅाकडाऊन आवडे सरकारला

इतर सर्व गोष्टी सुरू आहे परंतु दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जातंय

मंदिर खुले व्हावे म्हणून काल आंदोलन, कुठल्याही प्रकारची गर्दी झालेली नाही

फक्त महाराष्ट्रात मुंबईत नियम का?

जनआशीर्वाद चालते.... सणांच्या वेळी कोरोना पसरतो?

सुडबुध्दीने गुन्हे दाखल केले आहेत

अस्वलाच्या अंगावर जेवढे केस तेवढे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत

First published:

Tags: Mumbai, Raj Thackeray