मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dahi Handi: मनसेने दहीहंडी लावलीच; ठाण्यात विविध ठिकाणी हंडी फोडून मनसेकडून सरकारचा निषेध

Dahi Handi: मनसेने दहीहंडी लावलीच; ठाण्यात विविध ठिकाणी हंडी फोडून मनसेकडून सरकारचा निषेध

MNS Celebrate Dahi Handi in Thane: ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली.

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनामुळे यंदा दहीहंडी (Dahi Handi) साजरी करता येणार नाही, यावरुन सरकार आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली असून ठाण्यात याचे चांगलेच पडसाद उमटले. ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली (MNS celebrate Dahi Handi in Thane). कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून मनसैनिकांनीच दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहिहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा येथील मनसेचे मुख्य कार्यालय येथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेने आपला सराकार विरोधात निषेध नोंदवला. तर पोलिसांनी रात्रीच अनेक मनसैनिकांची धरपकड सुरु केल्याने कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ सुरु होती.

मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, तिसऱ्या लाटेला सुरुवात?

काल सकाळी ठाण्यातील नौपाडा येथील भगवती मैदानात दहीहंडी साजरी करणारच असा इशारा देत काल मनसेने दहीहंडीचे आयोजन देखील केले होते. तर पोलीस मंडप काढायला आल्याने मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव, शहर प्रमुख रविंद्र मोरे, संघटक पुष्कर विचारे हे उपोषणाला बसले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांनी मंडप काढण्यास सांगितले.

मंडप काढला आणि त्याचे सामान नेत असताना पुन्हा मनसैनिक आले आणि त्यांनी मंडपाचे सामान भरुन नेणारा टेम्पो अडवला पण त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ठाण्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला असून मनसैनिकांनी नियंमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

First published:

Tags: MNS, Shri krishna janmashtami, Thane