Home /News /mumbai /

MLC Election UPDATES : भाजपने केली पहिली 'बॅटिंग' तर सेनेचे आमदार अडकले ट्रॅफिकमध्ये!

MLC Election UPDATES : भाजपने केली पहिली 'बॅटिंग' तर सेनेचे आमदार अडकले ट्रॅफिकमध्ये!

Vidhan parishad Election 2022: अशातच शिवसेनेच्या आमदारांची बस ट्र्रॅफिकमध्ये अडकली आहे. तर राष्ट्रवादीचे 3 आमदार अजूनही पोहोचलेले नाही.

    मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीचे (MLC Election result) मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तिन्ही पक्षाचे आमदार विधान परिषदेकडे रवाना झाले आहे. सर्वात आधी भाजपने मतदानाचा हक्क बजावला आहे. तर महाविकास आघाडीचे आमदार मतदान बाकी आहे. पण, अशातच शिवसेनेच्या आमदारांची बस ट्र्रॅफिकमध्ये अडकली आहे. तर राष्ट्रवादीचे 3 आमदार अजूनही पोहोचलेले नाही. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे आमदार विधान परिषदेत दाखल होत आहे. सर्वात आधी भाजपच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत भाजप्या 50 आमदारांनी मतदानही केलं आहे. हरीभाऊ बागडे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, मंदा म्हात्रे, किसन कथोरे, बबनराव लोणीकर, रवी पाटील, विजयकुमार देशमुख आणि कालिदास कोळंबकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपच्या एकूण 50 आमदारांनी हक्क बजावला आहे. तर पवईतून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन निघालेले शिवसेनेचे नेते आणि  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.  विधान परिषद मतदानासाठी जात असताना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जोगेश्वरी अंधेरी दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे  शिवसेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकली आहे.  विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी आदित्य ठाकरेंचा आमदारांसोबत बसमधून प्रवास करत आहे. राष्ट्रवादीचे 3 आमदार अजूनही पोहोचले नाही मुंबईत! तर राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही मुंबईत न पोहोचल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अद्याप मुंबईत पोहोचलेले नाही. तर आशुतोष काळे हे सुद्धा मुंबईत अद्याप पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. तर दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे तिन्ही आमदार मतदान प्रक्रिया पार संपण्याच्याआधी मुंबईत पोहोचतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय? विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण 27आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या ४ जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे ५४ आमदार, शिवसेनेकडे ५६ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल. दरम्यान, या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपाच्या तर ५ जागा रिक्त होत असून ४ जागाच निवडून येत आहे. पण, भाजपने पाचवी जागा सुद्धा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Election, Shiv sena, Vidhan parishad maharashtra, Voting

    पुढील बातम्या