मुंबई, 19 नोव्हेंबर : वॉलमार्टच्या (Wallmart) मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट हेल्थकेअर (Flipkart enters in Healthcare secotr) क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक फ्लिपकार्ट कोलकातास्थित ऑनलाईन फार्मसी सस्तासुंदरमधील (SastaSundar) चे बहुसंख्या स्टेक खरेदी करेल. SastaSundar ऑनलाईन फार्मसी आणि डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म SastaSundar.com चालवते.
फ्लिपकार्टने अधिग्रहण कराराची रक्कम न सांगता शुक्रवारी सांगितले की या करारामुळे ते आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश करतील आणि फ्लिपकार्ट हेल्थ प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च करेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सस्तसुंदरमधील बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी निश्चित करार केले आहेत. Sastasundar एक डिजिटल फार्मसी प्लॅटफॉर्म Sastasundar.com चालवते. कंपनीने म्हटले आहे की ती फ्लिपकार्ट हेल्थ प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च करेल. फ्लिपकार्ट हेल्थ प्लस लाखो भारतीय ग्राहकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करेल.
खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा अन्..
SastaSundar.com वर डिजिटल हेल्थकेअर आणि फार्मसी सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्या नेटवर्कमध्ये सध्या 490 फार्मसीचा समावेश आहे. देशातील लोकांपर्यंत स्वस्त आणि ओरिजनल औषधे पोहोचवणे हा या कंपनीचा उद्देश आहे. यासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अॅनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करते. या अधिग्रहनानंतर SastaSundar.com ला फ्लिपकार्टच्या पॅन इंडिया नेटवर्कचा लाभ मिळणार आहे.
यशोगाथा: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे विजय शेखर यांची आताची कमाई थक्क करणारी
Flipkart ची कुणाशी असेल स्पर्धा?
ऑनलाईन फार्मसीमध्ये स्पर्धा खूप वेगाने वाढत आहे. या बाजारात फ्लिपकार्टची स्पर्धा रिलायन्सच्या NetMeds, टाटा समूहाची 1mg फार्मसी, PharmaEasy आणि Amazon Pharmacy शी होईल. कोरोनाच्या काळात ऑनलाईन फार्मसीची बाजारपेठ झपाट्याने विस्तारली आहे. यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या या मार्केटमध्ये एंट्री घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Flipkart, Online shopping