जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / MLC Election UPDATES : अजितदादांनी केलं डॅमेज कंट्रोल, 'ते' आमदार अखेर मतदानाला पोहोचले!

MLC Election UPDATES : अजितदादांनी केलं डॅमेज कंट्रोल, 'ते' आमदार अखेर मतदानाला पोहोचले!

नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील विधानभवनात दाखल झाले आहे.

नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील विधानभवनात दाखल झाले आहे.

MLC Election 2022: नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील विधानभवनात दाखल झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून :  विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान (MLC Election result)   प्रक्रिया पार पडत आहे. भाजपच्या आमदारांचे मतदान जवळपास पूर्ण झाले आहे. पण मतदान सुरू झाल्यानंतरही राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. अखेरीस उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगेच डॅमेज कंट्रोल केले असून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील विधानभवनात दाखल झाले आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सगळे आमदार मुंबईत हजर आहे. पण, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल न झाल्यामुळे खळबळ उडाली होती. खुद्द दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगून फोन बंद केला होता. पण, दुपारी ते विधानभवनात दाखल झाले आहे. ‘अजित पवार हे सर्वांकडे लक्ष देत आहे. अजित पवार हे सर्वांची काळजी घेत असतात. ते आमचे नेते आहे. त्यांनी जे सांगितलं ते मी करणार आहे,मी त्यांना भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया मोहिते पाटील यांनी दिली. तसंच, ‘एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजपकडून मला कोणताही फोन आला नाही. मी त्यांच्या कोणत्याही संपर्कात येत नाही. त्यामुळे ते मला सुद्धा फोन करत नाही’ असं म्हणत मोहिते पाटील यांनी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा फेटाळून लावली. ‘मी आता पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे. त्यांच्याकडे माझी नाराजी बोलून दाखवणार आहे. अजित पवार यांची भेट घेऊन मतदान करणार आहे ’ असंही मोहिते पाटील यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे दुसरे नाराज आमदार अण्णा बनसोडे सुद्धा विधानभवनात पोहोचले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सकाळी मुंबईत पोहोचले नव्हते. मात्र, ते आता दाखल झाले आहे.  मलिक-देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव तर दुसरीकडं एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिकेची दुपारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे मतदानास दोन्ही नेते मुकणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू असून ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. मतदान करण्याची परवानगी देणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्या याचिकेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यापूर्वी 11 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील त्यांना मतदान करता आले नव्हते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात