Home /News /mumbai /

MLC Election: आमदारांचे फोन खणखणले; फोडाफोडी टाळण्यासाठी खबरदारी, मुंबईत येण्याचा निरोप

MLC Election: आमदारांचे फोन खणखणले; फोडाफोडी टाळण्यासाठी खबरदारी, मुंबईत येण्याचा निरोप

MLC election : आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    मुंबई, 16 जून : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या आमदारांना संपर्क करुन मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपला मतदान केल्याने महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. हेच लक्षात घेत खबरदारी म्हणून आता राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना फोन करुन मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका झाला णि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळेच आता शिवसेनेने खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना फोन करुन मुंबईत पाचारण केले आहे. राज्य,सभेचट्या निवडणुकीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्वा आमदारांना 18 जून रोजी सकाळी मुंबईत बोलावले आहे. या सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईतील रेनेसां हॉटेलमध्ये असणार आहे. वाचा : राज्यसभा निवडणुकीत झाला भाजपला फायदा, 'त्या' आमदाराची आता विधान परिषदेला दांडी? शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये जोपर्यंत विधानपरिषदेची निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत या सर्वा आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्येच असणार आहे. 18 तारखेला सर्व आमदार हॉटेलमध्ये येतील. त्यानंतर तेथे शिवेसेनेचे नेते एक बैठक घेऊन सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवेसनेच्या आमदारांचा मुक्काम होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही हालचाली तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्यासाठी फोन करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेसने सुद्धा सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचं नियोजन केलं आहे. सतेज पाटील यांनी म्हटलं, काँग्रेस सुद्धा आमदारांना एकत्र करणार.. राहुल गांधींच्यावर कारवाई झाल्याने आंदोलनात सध्या काँग्रेसचे आमदार व्यस्थ आहेत. उद्या परवा सगळे आमदार एकत्र येतील. राज्यसभेतून आम्ही खूप शिकलो. तशी स्थिती आता येणार नाही याची दक्षता घेणार आहोत. आमदारांना निवडणुकीचे प्रशिक्षण देणे गरजेचे त्यासाठी एकत्र करणार आहोत. भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडे भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. 18 तारखेपासून भाजप आमदारांचा हॉटेलवर मुक्काम असणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीची पूर्ण जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. याआधी राज्यसभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात भाजप उमेदवार 1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड शिवसेना 1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी काँग्रेस 1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस 1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Election, NCP, Shiv sena

    पुढील बातम्या