साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 09 जून : अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणामुळे समाजमन सुन्न झालं आहे. आता या प्रकरणाचं अहमदनगर कनेक्शन समोर आलं आहे. या घटनेच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी मुंबईच्या विशेष पोलिसांचे पथक नगर इथं दाखल झाले असून त्यांनी अहमदनगर मधील बालिकाश्रम बालक मंदिर या ठिकाणी चौकशी केली आहे. मिरा रोड हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईचं पथक हे कलनगर इथं दाखल झाले होते. त्यांनी प्राथमिक स्तरावर याची माहिती घेताना मृत तरुणी सरस्वती वैद्य ही नगरमध्ये राहत असल्याची माहिती त्यांना मिळालेली होती. त्या मुलीने 10 वर्षांपूर्वी नगर सोडले असल्याचे सुद्धा समजले होते. त्यानुसार पोलिसांनी नगरमध्ये त्या संस्थेची माहिती घेऊन ते पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी येऊन संबंधित संस्थेमध्ये जाऊन त्यांनी विचारपूस केले असल्याचेही पुढे आले आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. मनोज साने असं या आरोपीचे नाव आहे, तर सरस्वती वैद्य असे संबंधित हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सरस्वती वैद्य ही अनाथ होती. तिने दहावीचे शिक्षण अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिकाश्रम संचालित बालिकाश्रम बालक मंदिर या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले होते. त्यानंतर ती मुंबईला राहण्यासाठी गेली होती तिच्या हत्येमुळे शिक्षकांनीही व्यक्त केली आहे. मनोज साने 3 वर्षांपासून राहत होता भाड्याने! दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनोज साने हा बोरिवलीतील बाभई नाका येथील साने रेसिडेन्सीमध्ये राहत होता. संपूर्ण निवासस्थानाचा फ्लॅट क्रमांक 702 मागील 3 वर्षांपासून भाड्याने देण्यात आला आहे. याप्रकरणी येथे मोलमजुरी करणाऱ्या महिलेने याबाबत माहिती दिली. मनोज साने यांच्या फ्लॅट क्रमांक 702 मध्ये राहणाऱ्या भाडेकरू महिलेने सांगितले की, आम्ही 3 वर्षांपासून म्हणजे 2020 पासून भाड्याने राहत आहोत. तेव्हा संवाद व्हायचा. करार झाला की भेटायचो. हा करार एकाच वेळी 2 वर्षांसाठी होता. तेव्हा भेटायचो आणि मग आगाऊ चेक द्यायचे. तो आमच्याशी मृदू बोलत होता. तो खूप कमी बोलत असे आणि तसेच याठिकाणी तो खूप कमी येत असे, त्यामुळे जास्त संवाद होत नसे. तो भाड्याने राहतो हेही आम्हाला माहीत नव्हते. त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. तसेच तो फारसा कोणाशी बोलत नसे. तसेच आम्ही त्याला भाडे अॅडव्हॉन्स मध्ये द्यायचो. त्याच्याशी शेवटचे बोलणे 30 तारखेला झाले. तसेच येथील वॉचमननेही माहिती दिली. त्याने सांगितले की, मी 2 वर्षांपासून काम करत आहे. मध्येच गावी गेलो होतो. गावातून येऊन महिना झाला. याआधी आणखी एक चौकीदार होता. इथे येण्याचा प्रश्नच नाही. त्यांना कधी पाहिले नाही, असेही या वॉचमनने सांगितले.