मुंबई, 1 जानेवारी 2022 : महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशावर आज पुन्हा कोरोनाचं (Corona) संकट गडद होताना दिसत आहेत. राज्याच्या राजधानी मुंबईत (Mumbai Corona) तर कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत भयानक वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे ही वाढ अशीच पुढचे काही दिवस सुरु राहिली तर सरकार (Maharashtra Government) आणि प्रशासनावर अखेर लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ येईल. या आधीच्या लॉकडाऊनची झळ आजही अनेकजण सोसत असताना पुन्हा काही दिवसांसाठी आपल्याला लॉकडाऊनला सामोरं जावं लागू शकतं. याबाबतचे स्पष्ट संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दिलेले आहेत. मुंबईत प्रचंड दाटवस्ती आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संकटापासून बचाव व्हावा, अनेक संसार, माणसांचे प्राण वाचावेत, अनेक कुटुंबावरील संकट दूर व्हावं म्हणून कदाचित सरकार याबाबतचा निर्णय घेऊ शकतं. पालकमंत्री अस्लम शेख लॉकडाऊनबाबत नेमकं काय म्हणाले? “मुंबई शहराची लोकसंख्या खूप जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग इथे प्रचंड वेगाने वाढू शकतो. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या खूप जास्त वाढली तर कदाचित काही दिवसांसाठी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे”, अशी भूमिका पालकमंत्री अस्लम शेख यांनी मांडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तर मुंबईकरांना पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जाऊ शकतं, असे स्पष्ट संकेत पालकमंत्र्यांनी दिली आहे. तसेच पालकमंत्र्यांनी मुंबईकरांना मास्क वापरण्याच्या, लसीकरण करण्याचे आणि नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. हेही वाचा : राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना Corona; लग्नसोहळे अन् राजकीय नेते ठरतायत सुपर स्प्रेडर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे देखील लॉकडाऊनचे संकेत दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तीन दिवसांत स्थिती बिघडलीय काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्कफोर्ससोबत बैठक घेतली. मुंबई, पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे. शर्यती, सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अमल बजावणी करा असंही अजित पवार म्हणाले. हेही वाचा : Corona ची तिसरी लाट? राज्यात या महिन्यात रुग्णसंख्या 2 लाख तर 80 हजार मृत्यू होण्याची भीती महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये कोरोना वाढला, मुंबईत प्रचंड वाढ महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी (31 डिसेंबर) दिवसभरात 8,067 नवे रुग्ण आढळले होते. त्यापैकी मुंबई शहरातच 5428 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत गुरुवारी (30 डिसेंबर) 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल हाच आकडा थेट 5428 वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात 1,766 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








