काश्मीरींसाठी विशेष प्रार्थना; MIM चे आमदार वारीस पठाण पोलिसांच्या ताब्यात

वारीस पठाण यांना ताब्यात घेतलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिलीय. इतर काही लोकांना ताब्यात घेतलं असून आमदार पठाण यांना फक्त त्या जागेवरून दूर होण्यास सांगितलं अशी माहितीही पोलिसांनी दिली.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 06:16 PM IST

काश्मीरींसाठी विशेष प्रार्थना; MIM चे आमदार वारीस पठाण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई 16 ऑगस्ट : काश्मीरसंबधातलं 370 कलम हटविल्यानंतर काश्मीरात तणावपूर्ण शांतता आहे. तर देशभरात त्याचं स्वागत करण्यात आलंय. मुंबईत शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर MIM चे आमदार वारीस पठाण यांनी काश्मीरी जनतेसाठी विशेष प्रार्थना करण्याचा प्रयत केला. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप पठाण यांनी केलाय. नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रार्थनेसाठी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

नोकऱ्यांवर गदा! इंजिनीअर होण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी आधी हे वाचा

तर वारीस पठाण यांना ताब्यात घेतलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिलीय. इतर काही लोकांना ताब्यात घेतलं असून आमदार पठाण यांना फक्त त्या जागेवरून दूर होण्यास सांगितलं अशी माहितीही पोलिसांनी दिली.

जम्मू काश्मीरमधील निर्बंधांवरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिने सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्रदिनाचा सोहळा साजरा करत असताना काश्मिरातील जनतेला मात्र प्राण्यांसारखं पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आहे,' असा आरोप इल्तिजा मुफ्ती यांनी केला आहे.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

Loading...

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने तिथल्या काही गोष्टींवर निर्बंध आणले होते. यावरूनच इल्तिजा मुफ्ती यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. 'मला कोणत्या कायद्याखाली ताब्यात घेण्यात आलं आणि किती काळासाठी, हे सांगावं,' असं इल्तिजा यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

...म्हणून साउथ अभिनेता विजयनं 400 लोकांना वाटल्या सोन्याच्या अंगठ्या

दरम्यान, वातावरणात तणाव निर्माण होऊ नये यासाठी जम्मू काश्मीरमधील निर्बंध अद्याप शिथील करण्यात आलेले नाहीत. अनेक पक्षांचे नेते अजूनही अटकेत आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने एक ऑडिओ मेसेज रिलीज केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MIM
First Published: Aug 16, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...