नोकऱ्यांवर गदा! इंजिनीअर होण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी आधी हे वाचा

नोकऱ्यांवर गदा! इंजिनीअर होण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी आधी हे वाचा

कॉग्निझंट Congnizant हा बड्या IT उद्योग शेकडो कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार आहे. 8 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या इंजिनिअर्सना आहे धोका. या क्षेत्रातल्या नव्या नोकऱ्याही कमी झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट :मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल क्षेत्रांवर मंदीचं सावट असल्याच्या बातम्या येत असतानाच आता IT क्षेत्रातूनही वाईट बातम्या यायला सुरुवात झाली आहे. याही क्षेत्रात नव्या नोकऱ्यांची संधी कमी होत आहे. उलट असलेल्या मनुष्यबळातच कपात करायला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी नोकरकपातीला सुरुवात केली असून Cognizant job cuts ची बातमी व्हायरल झाली आहे. कॉग्निजंट या बड्या आयटी कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होणार आहे. Congnizant ही मुळची अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी मल्टिनॅशनल आयटी कंपनी आहे. त्यांची भारतातही अनेक शहरात मोठी कार्यालयं आहेत. या कंपनीने अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना घरी पाठवायला सुरुवात केली आहे. पुणे आणि मुंबईतल्या ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांनाही या मंदीची झळ पोचण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच या कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली होती. कॉस्ट कटिंगसाठी आता पुन्हा एकदा हा निर्णय घेण्यात येत आहे. या वेळी शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागेल अशी चिन्हं आहेत. कॉग्निझंटने नव्या नोकऱ्या देण्याची प्रक्रियासुद्धा थांबवली आहे. कँपस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या प्रमाणावर ही कंपनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ करत असे. पण ज्या फ्रेशर्सची निवड झाली होती, त्यांना अपॉइंटमेंट लेटर अद्याप मिळाली नसल्याचं वृत्त बिझनेस टुडेने दिलं आहे. ऑफर लेटर मिळाल्यानंतर जॉइनिंग लेटर मिळण्यास विलंब होत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या काही लाभांमध्येही कपात केली आहे.

महाराष्ट्रात मंदीची लाट, हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

Cognizant ने अनुभवी लोकांनाही टर्मिनेशन लेटर द्यायला सुरुवात केली आहे. जागतिक मंदी आणि त्यात गुंतवणुकीचा अभाव यामउळे ही वेळ आली असल्याचं समजतं. ज्यांना 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे अशा मिडल लेव्हल एक्झिक्युटिव्हचा या नोकर कपातीत मोठ्या प्रमाणावर समावेश असेल, असं वृत्त आहे. ब्रायन हम्पशायर या Cognizant च्या CEO नी कॉस्ट कटिंगसाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, असं सांगितलं आहे.

12000 गुंतवून कमावले 6 लाख; एके काळी ही कंपनी सोनिया गांधींनाही देत होती महिन्याला 2000

IT उद्योगावर मंदीचं सावट असल्याची ही चिन्हं आहेत.याअगोदर वाहन उद्योगही मोठ्या प्रमाणावर अडचणीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या आटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्या मंदीच्या गर्तेत आहेत. याचा फटका कामगार क्षेत्राला बसतोय. कोलमडलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यामुळं आलेल्या आर्थिक मंदीचा फटका वाहन उद्योगासह लघुउद्योगांनाही बसत असल्याचं समोर आलंय. उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोठया कंपन्यांना तर इन आऊट करण्याची वेळ आलीय. तर काहीनी नो प्रोडक्शन डे जाहीर करत कंपन्यांच बंद ठेवल्याय. त्यामुळे वाहन उद्योग संकटात सापडला असून कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळ्याची शक्यता आहे.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातलही उच्चशिक्षितांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागत आहे. त्यामुळे इंजिनिअर होऊन मोठ्या पगाराची नोकरी लगेच मिळेल अशी स्वप्न बघत असाल तर वेळीच सावध व्हा...

-------------------------

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 16, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading