Home /News /mumbai /

MHADA Lottery 2022 : मुंबई, पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत होणार मोठं स्वप्न पूर्ण

MHADA Lottery 2022 : मुंबई, पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत होणार मोठं स्वप्न पूर्ण

म्हाडा

म्हाडा

MHADA Lottery: म्हाडाच्या घरांची किंमत ही आवाक्यात असल्याने अनेकांची म्हाडाच्या घरांना पसंती असते. इतकेच नव्हे तर म्हाडाची घरे ही विश्वासार्ह मानली जातात.

    मुंबई, 3 जून : मुंबई, पुण्यात (Mumbai, Pune) आपले घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु हे अनेकांना शक्य होत नाही. यासाठी राज्य शासन म्हाडाअंतर्गत (MHADA Home Plan) सामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. त्यामुळे आतासुद्धा स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी मुंबईमध्ये दिवाळीत म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2022 Mumbai) निघणार आहे. पुणे विभागाची सोडत मुंबईमध्ये दिवाळीत तीन हजार घरांची लॉटरी निघणार आहे. तसे म्हाडाच्या पुणे विभागासाठीही तब्बल साडेचार हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत निघणार आहे. (MHADA Lottery 2022 Pune) यामध्ये पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागासाठी तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. यासंदर्भातील जाहिरातही काही दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर यासाठी अर्ज करता येणार आहे. म्हाडाची घरे आवडीची  गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या पुणे विभागाकडून अनेक सोडती जाहीर करण्यात आल्या. आता काढली जाणारी ही दहावी सोडत असणार आहे. तर मागील दोन वर्षातील पुणे विभागातील ही चौथी सोडत असणार आहे. म्हाडाच्या घरांची किंमत ही आवाक्यात असल्याने अनेकांची म्हाडाच्या घरांना पसंती असते. इतकेच नव्हे तर म्हाडाची घरे ही विश्वासार्ह मानली जातात. म्हणून अनेक जण म्हाडामधील सोडतीमधील घर खरेदी करतात. त्यामुळे नागरिकांना यासाठी जाहिरात कधी निघणार, याची उत्सुकता लागली आहे. हेही वाचा - MHADA : म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत बदल; आता तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात मोडणार पाहा... म्हाडा टाऊनशीप उभारणार म्हाडा अंबरनाथमध्ये टाऊनशीप (Township in Ambarnath) उभारणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. ही राज्यातील सगळ्यात मोठी टाऊनशीप असणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून तब्बल 200 एकर जागेचे सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील वाढती लोकसंख्या पाहता, डोंबिवली आणि कल्याणच्या पुढे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पर्यायी टाऊनशिप उभारण्याचा विचार केला जात  आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mhada 2022, Mhada lottery, Mumbai, Pune

    पुढील बातम्या