मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /mhada exam : दलालांनो, उद्यापर्यंत उमेदवारांचे पैसे परत करा, जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा

mhada exam : दलालांनो, उद्यापर्यंत उमेदवारांचे पैसे परत करा, जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा

 सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत

सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत

12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी पैसे भरून पास करण्याच्या अफवा सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (mhada exam 2021) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित केली आहे. पण या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी पैसे भरून पास करण्याच्या अफवा सुरू आहे. पण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी  'गरिबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हाला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही' असा इशारा दिला आहे.

आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान गोंधळ पाहण्यास मिळाला होता. त्यानंतर आता म्हाडाच्या परीक्षामध्ये सुद्धा अफवांवर पूर आला आहे. आज दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे.

'म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत' अशी माहितीच आव्हाड यांनी दिली.

'माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही' असा इशाराच आव्हाड यांनी दिला आहे.

आरारा! याला म्हणतात ट्रॅफिक पोलिसांची दहशत; कारमध्येही हेल्मेट घालतात चालक

'ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हाला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही' असंही आव्हाडांनी बजावलं आहे.

'महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी पैसे भरून पास करण्याच्या अफवा सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांबद्दल पोलिसांना माहिती द्यावी, अशा व्यक्तींवर कडक गुन्हे दाखल केले जातील, असं आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

या राज्याच्या विधानसभेबाहेर गोंधळ आणि दगडफेक, पाहा भयंकर PHOTOS

'ही परीक्षा संपूर्णपणे पारदर्शक असून या परीक्षेमध्ये पास झालेल्यांची लेखी परीक्षा देखील घेतली जाणार आहे. नाशिक, अकोला येथून पैसे घेतले जाण्याची माहिती पुढे आली आहे म्हणून अश्या कोणत्याही फसवणुकीला बळी न पडत कोणत्याही प्रकारचा वशिला यामध्ये नसून रोजगार देण्यासाठी ही पदे उपलब्ध केले असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

First published:
top videos