जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आरारा! याला म्हणतात ट्रॅफिक पोलिसांची दहशत; कारमध्येही हेल्मेट घालतात चालक

आरारा! याला म्हणतात ट्रॅफिक पोलिसांची दहशत; कारमध्येही हेल्मेट घालतात चालक

आरारा! याला म्हणतात ट्रॅफिक पोलिसांची दहशत; कारमध्येही हेल्मेट घालतात चालक

विशेष म्हणजे हा प्रकार आपल्याच देशात घडतोय. अनेक ठिकाणी तर दुचाकीवरही हेल्मेट घालण्यास नागरिक नकार देतात. येथे तर चार चाकीतही हेल्मेट न घातल्यामुळे चलान पाठवलं गेलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 11 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बांदामध्ये लोक कारमध्येही हेल्मेट (Helmet) घालून फिरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामागे वाहतूक पोलिसांची (traffic police) दहशत असल्याचं सांगितलं जात आहे. येथील पोलीस हेल्मेट न घालता कारमध्ये बसलेल्या लोकांना चलान पाठवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपण हेल्मेट घातलं नाही तर आपल्यालाही चलान पाठवलं जाईल अशी भीती असल्यामुळे लोक कार चालवतानाही हेल्मेट घालत आहेत. चार चाकी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालतं नाही तरीही त्यांचं चलान कापलं जात आहे. दुचाकीसह चारचाकीमध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांचही वेठीस धऱलं जात आहे. अनेक ठिकाणी तर दुचाकीवरही हेल्मेट घालण्यास नागरिक नकार देतात. येथे तर चार चाकीतही हेल्मेट न घातल्यामुळे चलान पाठवलं गेलं आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं, तेव्हा कोर्टाने व्यक्तीला चलान भरण्यास सांगितलं. मात्र जेव्हा मालकाने सांगितलं की, तो चार चाकी गाडीत होता. तेव्हा कोर्टानेही त्याचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं व त्यानुसार कारवाई केली. हे ही वाचा- नागपूरातील पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात पडली MPची तरुणी;काही दिवसात पोलिसात रवानगी कोर्टाने त्याचा दंड माफ केला. याशिवाय चार चाकीकडून दंड आकारणाऱ्या वाहतूक पोलिसाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. एका पीडित व्यक्तीने सांगितलं की, 20 ऑगस्ट रोजी आरटीओने त्याच्याकडून चलान वसुल केलं होतं, कारण चारचाकी वाहन चालवताना त्याने हेल्मेट घातलं नव्हतं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात