मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /इंग्रजीतून शास्त्रीय संगीत सादर करणारे डोंबिवलीचे गायक, Video पाहून म्हणाल क्या बात है!

इंग्रजीतून शास्त्रीय संगीत सादर करणारे डोंबिवलीचे गायक, Video पाहून म्हणाल क्या बात है!

X
डोंबिवलीत

डोंबिवलीत राहणारे किरण फाटक हे मराठी, हिंदीसह इंग्रजीतही बंदिश गातात. गेल्या 10 वर्षांपासून ते हा प्रयोग करत आहेत.

डोंबिवलीत राहणारे किरण फाटक हे मराठी, हिंदीसह इंग्रजीतही बंदिश गातात. गेल्या 10 वर्षांपासून ते हा प्रयोग करत आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 22 डिसेंबर :  मनाप्रमाणे स्वरविस्तार झाला की कलाकार पुढच्या टप्प्याकडे वळतो, तो म्हणजे रागाची ‘बंदिश.’ रागाचं अमूर्त रूप सगुण रूपातून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘बंदिश’. रागप्रस्तुतीकरणासाठी विशिष्ट रागात आणि तालात बांधलेल्या गीताला ‘बंदिश’ किंवा ‘चीज’ असं म्हटलं जातं. यापूर्वी उर्दू, हिंदी, वर्ज भाषेत बंदिश होत्या.  आता चक्क इंग्रजीमध्ये बंदिश गायली जाते.  डोंबिवलीत राहणारे किरण फाटक हे मराठी, हिंदीसह इंग्रजीतही बंदिश गातात. लहानपणापासून शास्त्रीय संगीची आवड असलेले फाटक गेल्या 10 वर्षांपासून हा प्रयोग करत आहेत.

    काय आहे उद्देश?

    इंग्रजी भाषा ही जगात सगळीकडं समजते. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतचा जागतिक पातळीवर आणखी प्रसार व्हावा. इंग्रजी भाषिकांनाही बंदिश समजावी यासाठी फाटक प्रयत्न करत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी 50 ते 60 इंग्रजी बंदीश तयार केल्या आहेत.

    सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं ‘हाई झुमका वाली पोर’ गाणं कसं सुचलं? पाहा Video

    अनेक दिग्गज गायकांनी शास्त्रीय संगीताचा जागतिक पातळीवर प्रसार केला आहे. त्यामुळे आता परदेशातील नागरिक बंदिश शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आपलं शास्त्रीय संगीत इंग्रजी भाषेत सादर केलं तर ते जगभर चांगल्या पद्धतीनं पोहचू शकेल.

    शास्त्रीय संगिताच्या लोकप्रियतेमुळे परदेशी नागरिकही हे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्या ते त्यांच्या भाषेत बंदीश सादर करतील आणि त्या शिकण्याची आपल्यालावर वेळ येईल. योगासन ही भारतीय परंपरा आहे मात्र आता बाहेरून परदेशी लोक आपल्याला शिकवत असतात. हेच शास्त्रीय संगीता बाबतीत होऊ नये, म्हणून मी काम करत आहे,' असे फाटक यांनी सांगितले.

    कुटुंब रंगलंय गाण्यात! 'सारेगमप' स्टार स्वराला 4 पिढ्यांपासून आहे गायनाचा वारसा, Video

    फाटक यांनी यावेळी म्युझिक थेरिपीबद्दलही जनजागृती व्हावी असं मत व्यक्त केले. 'भारतीय राग संगितामध्ये स्वरांचं महत्त्व आहे. हे स्वर निर्गुण आणि निराकार असल्यनं मंगल आणि पवित्र असतात. त्यामुळे अत्यंत सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याैचा आपल्या शरिरातील विविध ग्रंथीवर परिणाम होतो हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. या थेरेपीचा सहाय्यक थेरेपी म्हणून प्रचार आणि प्रसार व्हावा,' अशी इच्छा पाठक यांनी व्यक्त केली.

    First published:

    Tags: Dombivali, Local18, Mumbai