मुंबई , 29 नोव्हेंबर : नकारात्मकतेचा नायनाट करणारं औषध म्हणजे संगीत. अनेक रोगांसाठीही संगीत थेरेपी ही उपयुक्त असल्याचं संशोधनातून सिद्ध झालंय. मन प्रसन्न ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारात आनंदी राहण्यासाठी आणि दुसऱ्यांनाही आनंद देण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. मुंबईतील एका कुटुंबात गेल्या चार पिढ्यांपासून संगिताची आराधना केली जात आहे. या आगळ्यावेगळ्या कुटंबाची आपण भेट घेऊ या कुटुंब रंगलंय गाण्यात मुंबईची स्वरा जोशी काही दिवसांपूर्वी सारेगमप या टीव्ही शोमधून बाद झाली. यापूर्वी ती मराठी सारेगमपमध्ये टॉप 5 मध्ये पोहचली होती. 9 वर्षांच्या स्वराला संगीताचं बाळकडू घरीच मिळालं आहे. तिच्यामध्ये अगदी जन्मत:च गायनाचा गुण उतरलाय. कारण, तिच्या आई आणि बाबाकंडील दोन्ही कुटुंब हे संगीतप्रेमी आहेत. स्वराच्या आई केतकी जोशी यांची 2009 साली सारेगमप कार्यक्रमात निवड झाली होती. गाण्याचेच गर्भसंस्कार स्वरा गर्भात होती तेव्हा 9 व्या महिन्यापर्यंत केतरी गाण्याचा रियाज करत असत. तिच्या जन्मानंतरही तिला मांडीवर घेऊनच त्यांचा सराव सुरू असे. आईचं गाणं पाहून स्वरा आलाप घेण्याचा प्रयत्न करू लागली. स्वरानं 3 वर्षांची असतानाच केतकी यांच्या गुरूकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. Video : लावणीसमोर उभं ठाकलं मोठं संकट, कलाकारांनी सांगितलं नेमकं कारण! आता स्वराची आईच तिची गुरू बनली आहे. मायलेकी एकत्र रियाज करतात. आईप्रमाणेच आजी आणि पणजीकडूनही स्वराला टिप्स मिळतात. स्वराचे बाबा छान तबला वादक आहेत. तसेच तिच्या मावश्या, मावस भावंड, आजी - आजोबा सुद्धा सुंदर गायन, वादन करतात. सारेगमपमधील पंचतारा स्वरानं मराठी सारेगमपमध्ये स्वरानं टॉप 5 मध्ये धडक मारली होती. तिच्या गायनाची पद्धतही वेगळी आहे. शास्त्रीय संगीताच्या शिस्तीचे पालन करूनच ती रियाज करते. ती सतत शास्त्रीय रागाचे सूर, आलाप किंवा काहीतरी गाणं गुणगुणत असते. MBA तरुणीचं नवं स्टार्टअप, मुंबईत सुरु केलं ‘व्रॅप हाऊस’, Video ‘मी माझ्या पणजी, आजी आणि आई कडून गायला शिकले मला गाणी गायला खूप आवडतं सारेगमपमध्ये मी खूप मज्जा केली,’ असं स्वरा सांगते. तिच्या पालकांना सुद्धा स्वराचा अभिमान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







