नाशिक 13 डिसेंबर : “हाई झुमक्या वाली पोर” या गाण्यानं सध्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अहिराणी भाषेतील हे गाणं सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग होतं आहे. इन्स्टाग्राम रिल्स असोत की युट्युब, फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटस यावर हेच गाणं ट्रेंड होत आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल 5 लाखाहून अधिक नेटिझन्सने यावर रिल्स बनवले आहेत. ज्यात सेलिब्रिटी पासून रिल्स स्टार्सचाही समावेश आहे. तर युट्युबवर तब्बल 20 मिलियनचाही टप्पा या गाण्यानं पार केला आहे. चला तर याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया हे गाणं कसं सुचलं? यामधील कलाकार कोण आहेत. कोण आहेत या गाण्यातील कलाकार? या गाण्यातील मुख्य कलाकार विनोद कुमावत आणि राणी कुमावत हे दोघं आहेत. विनोद हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आहे. त्याचं शिक्षण भातखंडी गावात झालेलं आहे. पुढे काही दिवस विनोद कळवणला आपल्या परिवारासोबत राहू लागला. विनोद याला लहान पणापासूनच गाणे गायची, डान्स करण्याची आवड होती आणि तो खानदेश भागातील असल्यामुळे अहिराणी भाषेवर त्याची चांगली मजबूत पकड आहे. मात्र, चांगला प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे त्याला त्याची कला मांडता येत नव्हती. मात्र, टिक टॉक जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्याने आपल्या कलेला वाव दिला आणि अनेक व्हिडिओ केले. ते चांगले हिट झाले.
ऋषिकेश रिकामे : जादुई आवाजाचा तरुण कसा बनला सोशल मीडियावर स्टार? पाहा Video
पुढे विनोद एका कंपनीत काम करून छंद जोपासत होता. अशाच काळात नाशिकमध्ये त्याची राणी सोबत भेट झाली. राणी ही सर्व सामान्य कुटुंबातील आहे. तिचे वडील रिक्षा चालवतात. तर आई शिवणकाम करून घरचा उदरनिर्वाह भागवते. राणीला गाणे गायची, डान्स करण्याची प्रचंड आवड आहे आणि आता हे दोघं ही सोबत अल्बम बनवतात. त्यांची अनेक गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. कर म्हणा लगण आणि हाई झुमका वाली पोर ही गाणी तुफान व्हायरल झाली आहेत.
कसं सुचलं हाई झुमक्या वाली पोर गाणं? अहिराणी भाषेतील या गाण्यानं अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. हे गाणं विनोदला अचानक सुचलं. तो राणी सोबत फोनवर बोलत होता. गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात विनोदला जमिनीवर कानातील ज्वेलरी पडलेली दिसली. त्याला काही ठिकाणी झुबे म्हणतात तर अहिराणी भाषेत त्याला झुमका म्हणतात. ते हातात घेतल्यानंतर विनोदला गाण्याची लाईन सुचली हाई झुमका वाली पोर हाई नदी तडी ले चालनी, नदी तडी ले चालनी, मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी पेवाले तीतडी चालनी..राघ्या वाघ्या ही बैलांची नाव आहेत आणि इथूनच हळूहळू पूर्ण गाण विनोदने बनवलं आणि हिट झालं. या गाण्याचे पूर्ण व्हिडिओ शूटिंग नाशिक जवळील ओझर परिसरात झालं आहे, असं कलाकार विनोद कुमावत याने सांगितलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला लोकलमधील भजन गायक कोण आहे? पाहा Videoविनोदची अनेक गाणी झाली हिट या आधीही विनोद कुमावतचे कर म्हणा लगन,मोबाईल वाली साली, दिलबरा, सैर गावना पावणा ही गाणी जोरदार हिट झाली आहेत.