Home /News /news /

कश्मीर पोलिसांना मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या बड्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं

कश्मीर पोलिसांना मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या बड्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं

19 वर्षाचा दहशवादी शाझीद फारुख डारला जम्मू काश्मीर पोलिसांनी बारामुला येथून अटक करण्यात आली आहे.

    जम्मू-कश्मीर, 28 जानेवारी : जम्मू काश्मीरच्या पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. लष्कर-ए-तोयबाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं गेलं आहे. 19 वर्षाचा दहशवादी शाझीद फारुख डारला जम्मू काश्मीर पोलिसांनी बारामुला येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या स्वयंभू प्रमुख कारी यासिरसह तीन दहशतवाद्यांना ठार केलं. भारतीय सैन्यासाठी हे मोठे यश होतं. गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने याला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. त्रालमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. कारी यासीर मागील वर्षी फेब्रुवारी (IED) स्फोट आणि लेथपोरा स्फोटात सामील होता. तो आयईडी तज्ज्ञ आहे आणि दहशतवाद्यांना भरती करण्यात तसेच पाकिस्तानमधून त्यांची वाहतूक करण्यात तो मोठं काम करतो. या गोळीबारात लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. पोलिसांना श्रीनगर किंवा आसपासच्या आयईडी हल्ल्याची माहिती सातत्याने मिळत असल्याचे आयजीपीने म्हटले होते.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या