मुंबई, 31 जानेवारी : मुंबईतील वाहतुक समस्या ही नित्याचीच बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नवे रस्ते आणि पुलांची बांधणी करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर मुंबईतील चारकोप (कांदिवली) या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे.
दरम्यान प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंतच्या अंतरात 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. यात मलबार हिलच्या खाली 75 मीटर खाेलीवर असलेले 12 मीटर रुंदीचे दुहेरी बोगदे काढण्यात आले आहेत.
दरम्यान हा रस्ता 17 किमी विस्तारित आहे मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते चारकोप कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हा मार्ग वांद्र्याचा कार्टर रोड, जुहू मार्गे वर्सोव्याला पोहोचणार आहे. यामुळे ट्राफीकच्या समस्या कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे 12,701 कोटी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील अंदाजीत खर्च करण्यात येणार आहे. 10.58 किमी पहिल्या टप्प्यातील कामाची एकूण लांबी असणार आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री, हळदी कुंकू कार्यक्रमाला न आल्याने शिंदे गटाचे नगरसेवक नाराज, म्हणाले...
तर 2.070 किमी मलबार हिल दुहेरी बोगद्यांची लांबी असणार आहे. 12.19 मीटर प्रत्येक बोगद्याचा व्यास असणार आहे. दरम्यान मागच्या दोन वर्षांपासून बोगद्याच्या काम सुरू होते. परंतु प्रवासात दोन मिनिटांत ते पार करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोस्टल रोड प्रकल्पामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास दीड-दोन तासांवरून थेट 20 मिनिटांवर येणार असल्याने प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे. यामुळे या मार्गावरील अर्थचक्राला चांगलीच गती मिळणार आहे. वांद्रे-वरळी सी लिंक ते वर्सोवा हे एरवी सुमारे 1 तासाचे अंतर या अद्भुत प्रकल्पामुळे अवघ्या 15 मिनिटांवर येणार आहे. यामुळे वाहतुकीची पूर्णपणे कोडी कमी होणार आहे. मुंबईकरांना यापासून मोठा फायदा होणार आहे.
हे ही वाचा : मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सेवा; गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर जलवाहतूक, जाणून घ्या तिकीट दर किती?
या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रीटचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर बोगद्याचा अंतर्गत व्यास प्रत्येकी 11 मीटर असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marine drive, Mumbai, Road transport and highways minister