Home /News /mumbai /

Mansukh Hiren death case मनसुख यांना बोलावणारा तावडेच होता विनायक शिंदे, ATS चा मोठा खुलासा

Mansukh Hiren death case मनसुख यांना बोलावणारा तावडेच होता विनायक शिंदे, ATS चा मोठा खुलासा

'रजेवर असताना त्याने हा अपराध केलेला आहे. त्याने मृतकाशी संपर्क केला, त्याला बोलावून घेतले होते'

मुंबई, 23 मार्च : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) छडा लागला असून एक एक बाजू आता समोर येत आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांना भेटणारा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे (Vinyak Shinde) हाच तावडे होता, असा महत्त्वाचा खुलासा महाराष्ट्र एटीएस ( Maharashtra ATS) पथकाचे जयजीत सिंग (Jayjit Singh) यांनी केला आहे. मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या तपासाबद्दल माहिती दिली आहे. मनसुख यांची हत्या करण्याच्या आधी कांदिवली येथून तावडे नावाच्या पोलिसाने मनसुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. पण मनसुख जेव्हा चौकशीला गेले असता तिथे विनायक शिंदे हाच होता. विनायक शिंदे याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग होता, असं जयजीत सिंग यांनी स्पष्ट केलं. 'विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलातील 2007 मध्ये वर्सोवा इथं झालेल्या लखन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आजीवन कारावासाची शिक्षा झालेला आरोपी आहे. मे 2020 मध्ये कोरोनाच्या काळात तो पॅरोलवर बाहेर आला होता. रजेवर असताना त्याने हा अपराध केलेला आहे. त्याने मृतकाशी संपर्क केला, त्याला बोलावून घेतले होते आणि हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे तपासामध्ये पुरावे प्राप्त झाले आहे, असंही सिंग यांनी सांगितले. या गुन्ह्यांत वापरण्यात आलेले सिम कार्ड जप्त केले आहे. काही सिम कार्ड हे गुजरात येथून जप्त केले आहे.  बनावट नावावर सिम कार्ड घेतले गेले आहे.  या प्रकरणी बुकी नरेश गोरला अटक केली आहे., असंही सिंग यांनी सांगितलं. Mansukh Hiren death case प्रकरणी 'त्या' व्होल्वो गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर मोबाईल फोन आणि सिमकार्ड नष्ट केले आहेत. जी व्होल्वो कार जप्त केली हे. ती गाडी मनसुख यांच्या हत्येकरता वापरली होती का याची चौकशी केली जात आहे. सचिन वाझे यांचा ताबा मिळावा याकरता ट्रान्सफर ॲार्डर मिळाली आहे. पण, NIA कोर्टात वाझे यांचा ताबा घेण्यासाठी ATS जाणार आहे, असंही सिंग यांनी सांगितलं. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पुढील तपास करण्यात आला होता. यामध्ये सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. पण सचिन वाझे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा दावा सचिन वाझेंनी केला आहे. पण त्यांच्या विरोधात पुरावे आमच्या हाती लागले आहे, असं जयजीत सिंग यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: ATS, Crime, Hiren mansukh, Maharashtra, Sachin vaze, एटीएस

पुढील बातम्या