धोनीचा 'मलिंगा लुक' फॅन्सना रुचला नाही, पाहा काय आहे या PHOTO मागचं गौडबंगाल

धोनीचा 'मलिंगा लुक' फॅन्सना रुचला नाही, पाहा काय आहे या PHOTO मागचं गौडबंगाल

एम एस धोनी आणि लसिथ मलिंगा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि वादग्रस्त ठरत आहे. वाचा काय म्हणातायंत या दोन्ही दिग्गजांचे चाहते

  • Share this:

मुंबई, 17 मार्च: मुंबईचं वानखेडे स्टेडियम 2 एप्रिल 2011 रोजी खचाखच भरलं होतं. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता आणि भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) शेवटच्या चेंडूवर एक जोरदार षटकार लगावत भारताला तब्बल 28 वर्षांनी जगज्जेतेपद मिळवून दिलं. होय आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपची ती फायनल. हा क्षण कोणताच भारतीय क्रिकेटरसिक विसरू शकणार नाही. प्रत्येकाच्या मनात जणू ते कोरलं गेलंय. तर ही आठवण काढायचं कारण म्हणजे या सामन्यात खेळलेल्या दोन दिग्गज खेळाडूंचे फोटो फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये एडिट करून एक वेगळा फोटो तयार करण्यात आला आहे. हे दिग्गज खेळाडू म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि दुसरा म्हणजे श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा. हा फोटो ट्विटरवर शेअर झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकून 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्ड कप @cricketworldcup या ट्विटर हँडलवरून अनेक आठवणी प्रसिद्ध केल्या जात आहेत. यामध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपमधील एक से एक आठवणींना उजाळा मिळत असल्याने चाहतेही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. या हँडलने सोमवारी धोनी आणि मलिंगा या खेळाडूंचा फोटोशॉप्ड फोटो हँडलवरून प्रसिद्ध केला. त्यावर त्यांनी लिहिलं. ‘ डिपिंग यॉर्कर्स. स्पिल कॅचेस. हेलिकॉप्टर शॉट्स. तो हे सगळं करू शकतो, सादर आहे MS Malinga.’ मात्र या ट्वीटला चाहत्यांकडून एक वेगळाच प्रतिसाद मिळाला.

यावर दोन्ही महान खेळाडूंच्या चाहत्यांनी हा फोटो डिलिट करण्याची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की तो फोटो सर्वाधिक का पाहिला जातोय?

संमिश्र प्रतिक्रिया या फोटोवर उमटत आहेत. काहींनी गमतीदार ट्वीट म्हणून यावर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. काहींचं मत आहे त्या फोटोला Dholinga म्हणावं तर काहींना वाटतंय की या फोटोला Mehenga  म्हणावं. लोकांनी आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्ड कप हँडलला अनेक पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे हो फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. संपूर्ण टक्कल आणि एखाद्या बौद्ध संन्याशासारख्या वेषात धोनी दिसला होता त्यामुळे प्रचंड चर्चा सुरू झाली. धोनी सतत हेअर स्टाइल बदलत असतो त्यामुळे चर्चांना ऊतच आला होता. पण नंतर लक्षात आलं की आयपीएल 2021 च्या नव्या जाहिरातीसाठी धोनीने तसा वेश परिधान केला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 17, 2021, 12:39 PM IST

ताज्या बातम्या