मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO: ठाण्यात बैलाचा वाढदिवस साजरा करणं मालकाला पडलं महागात, कोरोनाचे नियम मोडल्यानं गुन्हा दाखल

VIDEO: ठाण्यात बैलाचा वाढदिवस साजरा करणं मालकाला पडलं महागात, कोरोनाचे नियम मोडल्यानं गुन्हा दाखल

किरण म्हात्रे नावाच्या या 30 वर्षीय व्यक्तीनं आपल्या घरी बैलाचा वाढदिवस (Man Celebrates Bull's Birthday) साजरा केला. या वाढदिवसासाठी एकत्र जमलेल्या लोकांनी मास्क लावलेलं नव्हतं तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवला होता.

ठाणे 13 मार्च : जिल्ह्यातील एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीनं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत (Violation of Corona Rules) आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. किरण म्हात्रे नावाच्या या 30 वर्षीय व्यक्तीनं रेती बुंदेमधील आपल्या घरी बैलाचा वाढदिवस (Man Celebrates Bull's Birthday) साजरा केला. विष्णुनगर ठाण्यातील अधिकाऱ्यानं सांगितलं, की ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अशात या वाढदिवसासाठी एकत्र जमलेल्या लोकांनी मास्क लावलेलं नव्हतं तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवला होता.

या अधिकाऱ्यानं सांगितलं, की भारतीय दंड संहितेच्या कलम 269 (प्राणघातक संसर्ग पसरविण्याचे काम) आणि साथीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून नियमांचं पालन करण्याचं तसंच गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जा आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी हे सर्व नियम सर्रास पायदळी तु़डवले जात असल्याचं चित्र अजूनही पाहायला मिळतं.

कोरोनाचा वाढता प्रसार -

राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शुक्रवारी जिल्हा प्रशासनानं पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याच्या वेळाही कमी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील तब्बल १० हून अधिक जिल्हे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. यातील आठ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू, लॉकडाऊन तसंच कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

First published:

Tags: Birthday celebration, Corona, Rules violation