मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘बदनामीकारक बातम्या थांबवा’; SEX CD प्रकरणानंतर धास्तावलेल्या सहा मंत्र्यांची कोर्टात धाव

‘बदनामीकारक बातम्या थांबवा’; SEX CD प्रकरणानंतर धास्तावलेल्या सहा मंत्र्यांची कोर्टात धाव

एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

  • Published by:  News18 Desk

बंगळुरु, 7 मार्च : एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना राजीनामा द्यावा लागला. जारकीहोळी यांच्यानंतर आपल्याही विरोधात बदनामीकारक मजकूर बाहेर काढला जाईल अशी भीती बी.एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वाटत आहे. त्यामुळे येडियुराप्पा सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे.

‘काही प्रसारमाध्यमं आमच्य विरोधात कोणताही खातरजमा न केलेला मजकूर प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे आमची बदनामी होत आहे. या प्रकाराचा बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याची परवानगी त्यांना देण्यात येऊ नये,’ अशी तक्रार बंगळुरुतील नागरी आणि सत्र न्यायालयात केली आहे. (शिवराम हेब्बर, बी.सी. पाटील, एस.टी. सोमशेखर, के. सुधाकर, के.सी. नारायण गौडा आणि बसवराज) या सहा मंत्र्यांनी या प्रश्नावर न्यायालयात धाव घेतली आहे.

‘माध्यमांचा गैरवापर करुन विरोधकांची बदनामी करण्याचे मोठे राजकीय षडययंत्र रचण्यात आले आहे. या प्रकारची मोहीम थांबवण्यात यावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे.या अभियानामुळे एखाद्या व्यक्तीचं अनेक वर्षांपासून असलेलं चांगलं काम मातीमोल होऊ शकते. सरकार या प्रकराच्या चुकीच्या घटना थांबवण्यासाठी कायदा करण्याचा विचार करत आहे.’ अशी माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते आणि कर्नाटकातील मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

यापूर्वी एका महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे येडियुराप्पा सरकारमधील मंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये नोकरी देण्याचं जारकीहोळी यांनी आमिष दाखवलं आणि नंतर त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबतची एक कथित सेक्स सीडी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहळ्ळी यांनी सादर केली होती.

( वाचादेशातील 50 टक्के महिला विवाहबाह्य संबंधांमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण )

आणखी एक संभाषण लीक

त्याच प्रकरणात महिलेशी जारकीहोळी यांनी केलेलं संभाषण आता लीक झालं (Conversation Leak) आहे. कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळींनी या महिलेला सांगितल्याचं कळतंय. तसंच महाराष्ट्रातील लोक चांगले आहेत आणि कानडींना काही काम नाही असंही जारकीहोळी यांनी यामध्ये म्हंटलं आहे.

First published:

Tags: India, Karnataka, Sexual assault, Sexual harassment, Yediyurppa