मुंबई, 14 ऑगस्ट : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरांत पहाटेपासून पावसानं जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. पालघर, उत्तर मुंबई, कोकण किनार पट्टा भाग तसच दक्षिण मध्य मुंबईत ढगाळ वातावरण, काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पुढील 24 तास पालघर आणि कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे.
गुरुवारी कोकणात मुसळधार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार ते अति जोरदार पाऊस पडेल असही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 15 आणि 16 ऑगस्टला पावसाच्या हलक्या सरी तर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Heavy rainfall is very likely to occur at isolated places in Mumbai, Thane, Palghar and heavy to very heavy rainfall is very likely to occur at isolated places in Raigad, Ratnagiri and Sindhudurg today: India Meteorological Department (IMD)
— ANI (@ANI) August 14, 2020
हे वाचा-पुणेकरांसाठी ALERT, पूल पाण्याखाली जाणार असल्याने या भागातून प्रवास करणं टाळा
गुरुवारी मुंबईत सकाळी 70 ते 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईसह उपनगरांत संध्याकाळी पावसानं जोर धरला. त्यानंतर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. पहाटेपासून पावसानं मुंबईला झोडपलं आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक उपनगरांमध्ये वाऱ्यासह पावसानं जोर धरला आहे.
ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार पावसाची पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD FORECAST, Mumbai rain, Weather updates