Home /News /mumbai /

ST Strike updates: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ST Strike updates: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ST Strike updates: एसटीचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत.

    मुंबई, 10 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य शासनात (Maharashtra Government) विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर (ST employees strike) आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे. पाहूयात या मोर्चाच्या संदर्भातील अपडेट्स एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचे अपडेट्स गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्रातून अनेक एसटी कर्मचारी दाखल झाले आहे. परंतु मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, ही आता आर या पारची लढाई आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईत दाखल एसटीचे 376 कर्मचारी निलंबित राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारत 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील 45 डेपोतील 376 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत. भाजपनेच ST कर्मचाऱ्यांना भडकवले : अनिल परबांचा आरोप विलगीकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत रुजू व्हावे, असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. तसंच, भाजपनेच एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं, असा आरोपही परब यांनी केला आहे. 'राज्य सरकारने प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आम्ही पालन केले जर कोणी कोर्टाचा अपमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावर विचार करू. विलगिकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत, हे काम 1-2 दिवसात होत नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, ST, Strike

    पुढील बातम्या